भरधाव ट्रकच्या धडकेत मोहझरी येथील विद्यार्थिनी ठार...

आरमोरी:- येथील वडसा मार्गावरील एका खाजगी बँकेच्या जवळपास सार्वजनिक वाहतुकीच्या रस्त्यावर भरधाव येणारे ट्रकच्या धडकेत विद्यार्थिनी ठार झाल्याची घटना आज दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान घडली असून मृतक विद्यार्थिनीचे नाव प्रांजली नितेश भानारकर मु. मोहझरी ,पोस्ट. सुकाळा ,तालुका. आरमोरी ,जिल्हा. गडचिरोली येथील असून ही महात्मा गांधी विद्यालयात बारावीचे शिक्षण घेत असल्याची माहिती आहे.


सदर विद्यार्थिनी सायकलने शाळेतून सुट्टी झाल्यानंतर राखी घेण्यासाठी आपल्या मैत्रिणी सोबत जनरल दुकानात सायकलने जात असताना सदर ट्रक वाहनाने मागेहुन जोरदार धडक दिली. धडक दिलेल्या ट्रॅक वाहन क्रमांक MH-२०- ct- ४०४१ आहे. धडक मारतच वाहन चालक फरार होण्यास यशस्वी झाला. या घटनेची माहिती होताच पोलीस विभाग घटनास्थळ गाठून मृतक विद्यार्थिनीला आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात शविच्छेदनसाठी नेऊन घटनेचा पुढील तपास आरमोरी पोलीस विभाग करीत आहे .

अशा अचानक घडलेल्या घटनेने भानारकर परिवारावर शोककळा पसरली आहे.




Post a Comment

Previous Post Next Post