कोंढाळा जवळ बैलबंडी आणि ट्रकच्या धडकेत मुलगा जागीच ठार तर वडील गंभीर जखमी

देसाईगंज:- प्राप्त झालेल्या माहितीनुसार कोंढाळा जवळ बैलबंडी आणि ट्रकच्या अपघातात पिता आणि पुत्रा पैकी मुलगा जागीच ठार झाल्याची
माहिती मिळालेली आहे.



सविस्तर वृत्त असे आहे की,आरमोरी आणि देसाईगंज मार्गावरील कोंढाळा गावाजवळ रात्रौ 7.30 वाजता गटार साफ करणाऱ्या ट्रकने शेताकडून येत असलेल्या बैलबंडीला लोकमान्य टिळक महाविद्यालय जवळ मागेहून जबर धडक दिली त्या धडकेत वडील श्रीकृष्ण माणिक वाढई हे गंभीर जखमी तर मुलगा रोशन माणिक वाढई वय (20) जागीच ठार झाला.


पेटलेल्या ट्रकच्या व्हिडियो
👇👇👇👇👇👇


घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लागलेला असून जखमीं वडीलाला तात्काळ देसाईगंज रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. नागरिकांचा राग अनावर झाल्याने सदर संतप्त जमावाने अपघात करणाऱ्या ट्रकला नागरिकांनी पेटवून दिले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात लोकांची तोबा गर्दी जमलेली आहे.

तरूण युवकाचा घडलेल्या घटनेत मृत्यु झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास देसाईगंज पोलीस करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post