बेवड्यांना (दारुड्या) सात प्रकारच्या कर्करोगांचा धोका



दारूच्या सेवनावर अनेक वर्षांपासून संशोधन सुरू आहे. त्यात अनेक वेगवेगळे दावे केले गेले आहेत. पण, जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यूएचओने याच दारूविषयी एक गंभीर इशारा दिला आहे. दारूच्या पहिल्या थेंबापासून कर्करोगाचा धोका सुरू होतो तसेच सात वेगवेगळ्या प्रकारच्या कर्करोगांचा 'धोकाही दारूच्या सेवनाने भेडसावतो, असा इशारा डब्ल्यूएचओने दिला आहे. अहवालानुसार, दारूचे एक निश्चित प्रमाण कधीही ठरलेले नसते, ज्यामुळे हे निश्चित होईल की दारू आरोग्यासाठी चांगली आहे. अल्कोहोलच्या सेवनाने कमीत कमी सात प्रकारचे कर्करोग होऊ शकतात. यात तोंडाचा, गळ्याचा, यकृताचा, अन्ननलिकेचा, स्तनांचा आणि मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचा समावेश आहे. दारू शरीराचे खूप नुकसान करते. कर्करोगजन्य पदार्थांमध्ये अल्कोहोलचा समावेश करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post