महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर पोलिसांवर नक्षल हल्ला दोन पोलीस जवान शहीद


दिनेश बनकर कार्यकारी संपादक 
महाराष्ट्र- छत्तीसगड राज्या च्या सीमेला लागून असले ल्या छत्तीसगड राज्यातील बोरतलाव पोलीस चौकी अंतर्गंत आज दिनांक 20/02/2023 रोजी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास 10-12 च्या संख्येत असलेल्या महिला पुरुष नक्षल्यां च्या टोळीने विना शस्त्र चाय पिण्याकरीता गेलेल्या दोन पोलिसांना ठार केल्याची घटना घडलेली आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र व छत्तीसगड सीमेवर पोलिसां नी बंदोबस्त वाढविला असून जंगलात सर्चिंग सुरु केली आहे.








 मिळालेल्या माहिती नुसार आज सोमवार ला बोरतलाव पोलीस चौकीतील राजेश प्रतापसिंह व ललीत यादव आपल्या एका सहकारी मित्रासह मोटारसायकलने चाय पिण्याकरीता पोलीस चौकी पासून मुख्य राज्य मार्गावर असलेल्या ढाब्या कडे गेले असता आधीच त्या परिसरात दबा धरुन बसलेल्या नक्षल्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झालेला आहे. तर तिसरा जखमी असून जखमी शिपाया मुळेच सदर घटना पोलिसांना कळल्याचे वृत्त आहे. नक्षल्यांनी मोटार सायकल ला आग लावून घटनास्थळा वरुन पड काढलेलं आहे. महाराष्ट्र छत्तीसगड- राज्य पोलीस नक्षल्याचा शोध घेत आहेत.





Post a Comment

Previous Post Next Post