इसमाने केली गळफास लावून केली आत्महत्या


आज बाळापूर येथील रहिवासी जंगल शिवारात सरपन गोळा करण्याकरता गेले असताना एका पळसाच्या झाडाला एक इसम फाशीवर लटकून जंगल शिवारात पळसाच्या झाडाला गडपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याची सूचना तळोधी बाळापुर पोलीस देण्यात आली.
त्यानंतर चौकशी केली असता तळोदी बाळापुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तळोदी येथील बाजार चौक परिसरातील इसम विजय नथुजी वानखेडे (६०) तळोदी बाळापूर हा इसम असल्याचे निदर्शनास आले.

सदर इसम हा येत्या तीन वर्षापासून आपल्या परिवारापासून अलिप्त एकटाच राहत असल्याने त्याने नैरासशेतून ही आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे .

तळोदी बाळापुर पोलीस स्टेशनचे निरीक्षक डी. आर . शेंडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गोवर्धन व त्यांची चम्मू पुढील तपास तळोदी बाळापूर पोलीस करीत आहेत

Post a Comment

Previous Post Next Post