खड्यामुळे सोहले येथील पोलीस पाटलाचा मोटरसायकलने झाला मृत्यू

कोरची: कोरची ते बोटेकसा राष्ट्रीय महामार्गावरती दोन वर्षापासून जागोजागी खड्डे पडलेले आहेत बरेचदा रोड दुरुस्त करण्यात यावा ह्या संदर्भात वेळोवेळी बातमी प्रकाशित करुण मागणी केली, परंतु अजून पर्यंत ते खड्डे बुजविण्यात आले नाही. या खड्यामुळेच सोहले येथील पोलीस पाटलाचा मोटरसायकलने मृत्यू झाला. जुमेनसिंग काटेंगे वय (४०) रा. सोहले येथील पोलीस पाटील या पदावर कार्यरत आहे. पोलीस पाटील हे छत्तीसगड येथील कोरचाटोला येथे आपल्या सासुरवाडीला सकाळी स्वतःच्या मोटार सायकलने गेले होते. त्यानंतर परत येत असताना बोटेकसा पासून पहिल्या नाल्याजवळ पोलीस पाटलाची मोटरसायकल खड्ड्यात गेल्यामुळे त्यांचा बॅलन्स बिघडला व ते मोटारसायकल धरून रोडवरती पडले व त्याचा जागेतच मृत्यू झाला.
त्यानंतर गावच्या लोकांना माहिती होताच घटनास्थळी धाव घेतली व 108 गाडी बोलावून प्राचारण करण्यात आले. माञ त्यांचा जागेतच मृत्यू झाला होता. पोलीस पाटील हे मनमिळाऊ प्रेमळ स्वभावाचे होते त्याचा पश्चाताप पत्नी, आई व भाऊ, असा आप्त परिवार आहे. त्याच्या निधनाबद्दल हळदळ व्यक्त केल्या जात आहे. वृत्त लिहेपर्यन्त, तक्रार दाखल झालेली नव्हती. या खड्ड्यांमुळे पुन: कीती लोकांना जीव गमवावा लागनार तेव्हा याकडे लोकपप्रतीनीधिंचे लक्ष लागेल याची खंत वाटते.

Post a Comment

Previous Post Next Post