सावरकर भक्त आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा (भाग-२)

सावरकर भक्त आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा (भाग-२)
२२ प्रतिज्ञांमध्ये डॉ.बाबासाहेबांनी तत्त्वज्ञान आणि वर्तन यांचा मेळ आणि समतोल घातला आहे. काही अंश धर्म, देवांवर श्रद्धा असलेली सर्वधर्म समभाव म्हणवून जगणारी विचारच करित नाहीत. कोणताच धर्म विचार स्वतंत्र देत नाही.
२२ प्रतिज्ञांमध्ये डॉ.बाबासाहेबांनी तत्त्वज्ञान आणि वर्तन यांचा मेळ आणि समतोल घातला आहे. काही अंश धर्म, देवांवर श्रद्धा असलेली सर्वधर्म समभाव म्हणवून जगणारी विचारच करित नाहीत. कोणताच धर्म विचार स्वतंत्र देत नाही. देव, धर्मांच्या प्रेमात पडलेली अशी आपली काही अर्धवट राव म्हणतात इतर धर्मियांना २२ प्रतिज्ञातील काही प्रतिज्ञा लागू होत नाही. २२ प्रतिज्ञा ह्या कालबाह्य झाल्या आहेत असे काही महाभाग बेताल व्यक्तव्य करतांना दिसतात उदा. ख्रिश्चन, मुसलमान, वर्णाश्रम ब्राह्मणी अर्थात हिंदू वैगरे म्हणून २२ प्रतिज्ञातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देव आणि अवतार ही खोटी संकल्पनाच कायमचीच नाकारली आहे.
देवच नाकारला तर मग पुत्र, प्रेषित मानण्याचा विषयच संपलेला आहे. त्यांचे खलनायकी अवतारी चरित्र हा विचार बुद्धिवाद्यांना कळू नये हीच मोठी शोकांतिका आहे. हे पुस्तक आदर्श समाजाचे प्रारूप म्हणून आपणाला अभ्यासून समजून घ्यावं लागेल. सर्वधर्म हे एकाच ईश्‍वराकडे घेऊन जाणारे वेगवेगळे मार्ग आहेत आणि या अर्थाने ते समान आहेत असं मानलं तर बुद्ध ईश्‍वर मानतच नाही. तर मग अवतार कसा काय ठरू शकतो? मुळात अडीच हजार वर्षापूर्वीच बुद्धांनी जग अनित्य आहे, परिवर्तनशील आहे म्हणून सांगितले. विज्ञानाचे वय जेमतेम सहाशे वर्षापूर्वीचे आहे. 
त्या कित्येक वर्षाअगोदर बुद्ध हे सत्य सांगतात बुद्धाचा पुढचा विषयच ईश्‍वर, आत्मा, नरक, परलोक, पुनर्जन्म हा नव्हताच बुद्ध हा एक माणूस होता आणि त्याचा एकमेव विषय हा माणूसच होता. मग बुद्धाला अवतार म्हणून घोषित करण्याचा विचित्र प्रकार या देशात का केला आहे. महायान पंथाने अवतार कल्पना बोद्ध धम्मात आणली. पूजा-अर्चा यांचे स्तोम माजविले. या बदलाला जेवढे विरोधकांचे कटकारस्थान कारणीभूत आहे. तेवढेच बोद्ध अनुयायांची गाफिलता कारणीभूत आहे. बुद्धाची क्रांतीप्रवणता त्यांना पेललीच नाही. त्यानंतर जवळ जवळ अडीच हजार वर्षानी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाची क्रांतीकारी ध्वजा आपल्या खांद्यावर दिली आहे. 
बाबासाहेबांनी पुन्हा एकदा क्रांतीचक्र फिरविले आहे. नवा आशय आपणासमोर मांडला आहे. म्हणून डॉ.बाबासाहेबांनी २२ प्रतिज्ञांतून देव आणि अवतार या संकल्पनेचाच धिक्कार केलेला आहे. देव, अवतार हे सर्व थोतांड आहेच हे रिडल्स इन हिंदुझम मधून बाबासाहेबांनी सिद्ध केलेले आहे. बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथात बोधिसत्व असलेले गौतम सम्यक सम्बोधी प्राप्त झाल्यावर बुद्ध झाले, या सदराखाली बाबासाहेब खुद्द लिहितात जातक सिद्धांत अथवा बोधिसत्वाच्या अनेक जन्माचा सिद्धांत हा अवतारवादाच्या ब्राह्मणी सिद्धांतासारखा वाटण्याची शक्यता आहे. उदा. देवाचे अवतार घेणे बुद्ध विचार संपविण्यासाठी येथे अनेक युक्त्या केल्या गेल्या. बुद्ध धम्माला धर्माची शाखा आणि त्याच्या जन्मास विष्णुचा नववा आवतार म्हणून हिनविण्यात येत होते. 
धर्माच्या परंपरेत वाढलेल्या लोकांनी धम्म आणि धर्म यातील फरक जाणून न घेतल्यामुळे ते ज्या चष्म्यातून पाहतात तो चष्मा अवतार आणि अज्ञान अंधश्रद्धेने बरबटलेला असेल तर त्यांना बुद्ध धम्म या अवतारांच्या नाही हे २२ प्रतिज्ञेतून बाबासाहेबांना जाहिर सांगावे लागले. बुद्ध धम्मात अंधश्रद्धेला मुळीच थारा नाही. मग अवतारवाद असेलच कसा? तर्क आणि विवेकी स्वतंत्र देणारा बुद्ध ऐहीपस्सिको असा सताड मार्ग तपासायला सांगतो. बुद्धाचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे हा ( ईश्‍वराची ) पारंपारिक संकल्पना नसलेला धम्म आहे. या धम्मात चक्क ईश्‍वरच नाही. त्यामुळे ईश्‍वराचे दलाल म्हणून काम करणारे भट, पुरोहित आणि त्यांनी केलेल्या भोळ्याभाबड्या समाजाचे शोषण नाही. नाना विद्रूप देव, दैवते, दैववाद, अवतार, प्रेषित, पुनर्जन्म, आत्मा, भुतखेत, स्वर्ग नरक, पिंडदान, खोट्या प्रवृत्ती, वृत्तवैकल्ये, ताईत, गंडे, दोरे, मंत्र,तंत्र, माळ जप, उपवास शिवाय जाती संप्रदायाची पंथाची विषमतावादी उतरंड या धम्मात नाहीत या सार्‍या भाकड कथा आहेत.  
१४ जानेवारी १९५१ साली वरळी येथे धम्मदीक्षे आगोदार बाबासाहेब जनतेला बजावतात, ज्यांना सवड असेल त्यांनी येथे यावे, बुद्ध धम्म शिकावा व त्यानंतर त्याचा स्वीकार करावासा वाटला तर करावा, नाहीतर बाराभाईची खिचडी करून चालणार नाही. फक्त बुद्ध धम्मच पाळा इतर काही नाही. हे बाबासाहेब त्यामुळेच आपल्या अनुयायांना सांगतात तुम्हाला सार्‍या वाईट चालिरिती घेऊन बुद्ध धम्मात येता येणार नाही, मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणांच्या हातून करवून घेणार नाही. २२ प्रतिज्ञात आठव्या नंबरची विशेषतः ही प्रतिज्ञा का म्हणून देतात बाबासाहेब, कारण एकदा टाकलेली थुंकी पुन्हा कोणी कोणत्याही मार्गी चाटायला कोणी जाऊ नये. 
आपल्या देशात खर्‍या अर्थाने लोकशाही राबविण्यासाठी देशाला लागलेली विषमतेची, द्वेषभावनेची, अंधश्रद्धेच्या धर्म जातीच्या उच्च नीच्चतेच्या अज्ञानाची कीड धुऊन काढली पाहिजे. हजारो वर्षे ब्राह्मण भुदेव म्हणून मान्यता पावलेल्या या संकल्पनेला दिलेला नकार आणि धर्म जाती, देवाच्या नावावर पोटभरु भटगिरीला, भोन्दूगिरीला, धूर्त, लबाड़ लोकांना दिलेला नकार हा तेवढाच या जगात संशोधनाचा विषय ठरला आहे. काही स्वार्थी लोकांनी बौद्ध वाड्मयामध्ये बुद्धीला न पटणार्‍या बाबी घुसडविल्या आणि बोद्ध धम्माला अनिष्ट वळण दिले आहे. ह्या प्रतिज्ञा यानिमित्ताने अंत्यत महत्वाच्या आहेत. बुद्ध मानवपुत्र होते. स्वातंत्र, समता आणि बंधुता हा धम्माचा मूलभूत पाया आहे ते करुणाकार होते. 
त्यांनी आपल्याला झालेले सब्बे सत्ता सुखी असे लोक कल्याणाचे ज्ञान राजापासून रंकला सांगितले. म्हणून बुद्ध धम्माशी विसंगत कार्यें कोणती वर्तन कोणते याची जाणीव करून अज्ञान, विषमता, अंधश्रद्धाळू गोष्टींना धम्मात विसंगत असल्यामुळे बंद करावे असं या प्रतिज्ञातून सांगणं आहे. बुद्धाने पंचशील आणि अष्टांग मार्ग व दहा पारमिता दिल्या असतांनाही डॉ.बाबासाहेबांना धम्म स्वीकारावेळेस विशेष या प्रतिज्ञा देण्याची गरज का भासली? तर त्याला कारणही तसेच आहे. 
भारताची एकंदर परिस्थिती, त्यातील रुढी परंपरा, दैववादाचे धार्मिक उत्साह, व्यसनाधीन प्रवृत्त, प्राण्यांची होत असलेली हत्या, व्यभीचार, जातीव्यस्था व लोकांची इतर जातीतील लोकांशी वागण्याची पद्धती या सर्वांचा विचार करून तसेच भविष्यात हा धम्म अधिक लवचिक व अधिक विज्ञानवादी कसा बनेल या सर्व गोष्टींचा विचार करूनच बाबासाहेबांनी संस्काराचा वर्तनात परिवर्तन म्हणून २२ प्रतिज्ञांची निर्मिती केली. बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा या प्रत्येक व्यक्तीस माणूस म्हणून जगण्यास पुरक अशा ठरतात. या प्रतिज्ञा अंगीकारल्या असता ती व्यक्ती भविष्यात कोणत्याच परिस्थितीत डगमगणार नाही. 
चांगला व्यक्ती घडण्यासाठी पंचशील महत्वाचे आहे तर आदर्श समाज घडण्यासाठी अष्टशील, दहापारमिता आवश्यक आहेत. देशाची प्रगती तेव्हाच होईल जेव्हा स्वातंत्र, समता आणि बंधुता ही मूल्य जगण्याचा भाग होतील हे मात्र खरे. यातून बाबासाहेबांनी आपली यापुढील गती, प्रगतीसाठी स्वच्छ भूमिका त्यांनी जगासमोर अदा केली आहे. कोणी मग कोणत्याही चष्म्यातून पाहावे. डॉ. बाबासाहेब सांगतात धर्म स्वीकारायचा तो पूर्ण तावून सुलाखूनच स्वीकारला पाहिजे. बाबासाहेब लिहितात सुरा ही सामान्य दारू प्राचीन आर्य हे पुरेसे मद्यपी होते. त्यांच्या धर्माचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे मद्य. वैदिक देव दारू पित असत. 
देवांची दारू ‘सोम’ या नावाने ओळखली जाई. आर्यांचे देवच दारू पित असल्याने आर्यांनाही दारू पिण्याबाबत कोणतेच बंधन नव्हते. उलट दारू पिणे हा त्यांचा धर्मकार्याचा एक भाग होता. अनेक सोमयाग केले जात होते. सोमरसपान नाही असे असे फारच थोडे दिवस असत. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तीन उच्चवर्णांसाठीच सोमरस होता. याचा अर्थ शूद्र दारूपासून दूर होते असे मात्र नाही. ज्यांना सोम पिण्याची बंदी होती. ते सुरा पीत असत. सुरा ही सामान्य दारू बाजारात विकली जाई. केवळ पुरुषच दारूच्या आहारी गेले होते असे नव्हे तर, स्त्रियांनाही दारू हवी असे. 
अहिंसेचे कोडे कुटप्रश्न १३ ‘रिडल्स इन हिंदुझम’ सुरा-मेरय-मज्ज-पमादट्ठाना वेरमणी, सिक्खापदं समादियामि. पंचशीलेत बुद्ध सर्वांत शेवटी हे शील आवर्जून तेव्हा वदवून घेतात कारण ज्या समाजाचे विचारचक्र थांबते तिथे विकृती वास करते. अर्थातच डॉ.बाबासाहेबांनी जगातील सर्वधर्म आणि धर्मग्रथांची चिकित्सा केली आणि धम्म दीक्षितांना ज्या २२ प्रतिज्ञा दिल्या त्या काही जातीय भावना वाढविण्यासाठी नाहीत तर मानवी जीवनांनी अंधश्रद्धा सोडावी आणि बुद्धिवादीची कास धरावी. भोळ्या मनाचे आपले अनुयायी बुद्धाच्या नावावर सुद्धा इतरस्त्र भरकटून जातील याची त्यांना पुरेशी कल्पना होती.
१८ ) प्रज्ञा, शील आणि करुणा या तीन तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतित करेन यातच त्यांना अभिप्रेत असलेला सम्यक बुद्ध कोणत्याही समाधीच्या भ्रमात आणि संभ्रमात त्यांनी ठेवलेला नाहीत. सम्यक विना समाधी, ध्यानाची, विपश्यना हे एक बुद्धिझमला हळूहळू संपविण्याची विकृतीच आहे ही काही संस्कृती नव्हे बुद्धाला संपविण्यासाठी विदेशात आणि आपल्या स्वदेशात अनेक कट्ट रचले गेलेत, पण १९५६ च्या धम्मक्रांतीने जगाला २२ प्रतिज्ञा देऊन सम्यक दृष्टी दिली आहे ती दृष्टी विश्‍व पाहाण्यासाठी आहे. त्या विश्‍वातील घडामोडी आकलन करून घेण्यासाठी आहे. 
या व्यवस्थेने हजारो वर्ष झोडपले आता झोपविण्याचे कारखाने जागोजागी बांधत आहेत हे आपण ओळखले पाहिजे. २२ प्रतिज्ञातील ही अठरावी प्रतिज्ञा तेवढ्याच ताकदीने समजून घेणे गरजेचे आहे. त्याला कारण आहे डॉ. बाबासाहेबांनी ज्या उद्देशासाठी धम्म स्वीकारला तो उद्देशच आपणाला माहिती नसेल तर त्याची पूर्तता कशी करणार? धम्म हे जर मानवी जीवनाच्या मुक्तीचे तत्वज्ञान असेल तर त्याच्या काळात नवे आयाम देणे हेच काम २२ प्रतिज्ञातून बोद्ध धम्माला सरण जाण्यास डॉ. बाबासाहेब सांगतात. धर्माच्या जोखडातून सुटला म्हणून प्रज्ञावंतांचा समाज, अर्थात प्रबुद्ध भारत आणि बौद्धमयविश्‍व घडविण्यासाठी ते बुद्ध तत्वला अनुसरण्यास सांगतात. 
म्हणजेच फक्त आणि फक्त बुद्धविचार कृतीत उतरविण्यास सांगतात. येथे शरण जाण्याचा मुद्दा नाही शरण म्हणजे अधिन होणे जे आहे तसे स्वीकारणे हे शरण येथे त्यांनी फरक केला आहे. जसे धर्म आणि धम्म ते म्हणतात धम्माचे नाते विचारांशी आहे. बुद्धाप्रती डॉ. बाबासाहेबांचा महान आदर आहे. कारण बुद्धांनीच मानवला विचार स्वातंत्र्य दिले आहे. बुद्धाला अनुसरणे म्हणजे भक्तीचा संप्रदाय नव्हे किंवा भक्ती करणे ठरत नाही. भक्ती करणे हे धम्माच्या तत्वात बसत नाही. अनुसरण करणारा स्वातंत्र्य असतो. धम्मात हेच स्वातंत्र्य आहे. बुद्धाला अनुसरणे म्हणजे एका प्रवाहितपणाचे अनुसरण करणे ठरते. अनुसरण करणे म्हणजे डोळे मिटून माळेचा जप करणे नव्हे. बुद्धाच्या दृष्टीकोनातून सर्व मनुष्यमात्र समान हे व्हिजन आहे. 
२२ प्रतिज्ञात कोठेही शरण जाण्यास न सांगता शिकवणुकीने वागेन अशाच प्रतिज्ञा आहेत. सद्दधम्म म्हणजे दुसरे तिसरे काही नसून तत्वज्ञान आहे. डॉ.बाबासाहेबांनी याचा तपशील बुद्ध आणि त्याचा धम्म या पुस्तकात मांडला आहे. आपण अभ्यासणे आवश्यक आहे. कारण बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना मार्गदर्शन करण्याच्या हेतूने २२ प्रतिज्ञा दिल्या धम्माचा वेळोवेळी झालेला र्‍हास किंवा संभाव्य गोंधळाचे कारणच नष्ट व्हावे. आपल्या अनुयायांना सुलभ व पूर्णपणे स्पष्टता यावी यासाठी आपल्या धर्मचिंतनाचे रेडिमेड स्वरूप अगोदरच सांगून त्यांना काय स्वीकरायचं आणि काय काय नाकरायचं याचे कष्ट पडू नये म्हणून घेतलेली ती सावधानता, २२ प्रतिज्ञा हे संक्षिप्त असे प्रियांबल आहे. 
एका अर्थाने १९५६ च्या धम्मदीक्षेने जगात २२ प्रतिज्ञेद्वारे उजेड संस्कृतीच दिली. बाबासाहेबांनी विज्ञानवादी बोद्ध धम्म स्वीकारला जगात जे काही घडते ते घडण्यासाठी कारण आहे. कारण त्यात प्रतित्यसमुत्पाद हा सिद्धांत बुद्ध धम्माचा महत्वाचा सिद्धांत आहे. या सिद्धांताचे विश्‍लेषण बाबासाहेबांनी द बुद्ध अँड हिज धम्म या ग्रंथात सविस्तरपणे केले आहे. आज आपण पाहतोय रंगात रंगून जाणारे शिक्षित विद्वान घरोघरी आहेत पण मानसिक गुलाम आहेत. मग तो राष्ट्रपती असो की मनोभावे काल्पनिक दैववादास भजणारे डॉक्टर असो, वैज्ञानिक क्षेत्रातील इतरही कोणीही असो पण एखादा शास्त्रज्ञ असतो. चंद्रयान उडविणारा पण नारळ फोडतो की नाही? आता विमान ही विज्ञान क्रांती आहे पण राफेलच्या चाकाखाली लिंबू चिरडणारे कॅबिनेट मंत्री आपणही पाहिलेत ही मानसिक गुलामगिरी आहे. तेथे वैज्ञानिक क्षेत्रात सबंध देशाची नालिस्ती तर होतेच पण स्वतःची विद्वत्ता गहाण राहते ना हा प्रश्‍नआहे. 
२२ प्रतिज्ञा कोणत्या धर्माला टार्गेट म्हणून संविधानाच्या शिल्पकाराने दिलेल्या नाहीत. भारतात घरोघरी आणि प्रत्येक शहराच्या गल्लीबोळात मंदिरं आपण उभी पाहतो, आपण मानत असणारे जागृत देवस्थाने तेहतीस कोटी इतर असतांनाही जगात सर्वांत दारिद्र, गरीब, अज्ञानी आपला देश भारत राहवा ही शोकांतिका नाही का? एवढी हे आपल्याला देश प्रगतीच्या, मानसिक विकासाच्या दृष्टिकोनातून समजून घ्यावं लागेल, प्रगतीच्या दिशेने देशाला घेऊन जावं म्हणून घटनेतील कलम ५१ ड समाजवाद, मानवतावाद आणि विज्ञानवाद रुजविण्या सांगत असता शेवटी प्रबुद्ध भारत घडविण्या बाबासाहेबांना २२ प्रतिज्ञा निर्माण कराव्या लागल्यात. बुद्धांच्या मुर्त्यां जमिनीची छाती फाडून त्यांच्या अस्तित्वाची साक्ष देत आहेत की बुद्धापूर्वी या पृथ्वीवर कोणतीही मानवी सभ्यता नव्हती, बुद्ध हा मानवी सभ्यतेचा पहिला इतिहास आहे, हा देश बुद्ध लोकांचा आहे आणि हवेत उडणार्‍या काल्पनिक चमत्कारिक पात्र पुस्तकांत मर्यादित होते. 
काही लोक म्हणत असतील काहीही समाज जीवनात फरक पडला नाही, पडत नाही. तर बंधू आणि भगिनींनो समाजात बदल घडून येत आहे. अन्याय अत्याचार विषमतेवादी समाजामध्ये घडणे स्वभाविक आहे तो घडत राहणार, भीमा-कोरेगाव प्रकरण, खर्डा, सोनाई, खैरलांजी ही अमानवी कृत्य आहेतच पण त्याच बरोबर समतेच्या मूल्यांना स्वीकारणारी संख्या जर वाढत असतील अनेक भटक्या विमुक्त, जाती-जमाती धम्म स्वीकारा करत असतील, ओ. बी. सी. बोध्द धम्माच्या वाटेवर अभियान राबवित असतील अनेक इतर धर्म, जातीतील विचारवंत बुद्धाच्या धम्माविषयी मांडणी करत असतील तर बुद्ध यांच्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीचे हे सगळ्यात मोठं यश दिसून येत आहे.
संदीप महाडीक (क्रांतीभूमी, महाड)
९२२२४३७८४९

Post a Comment

Previous Post Next Post