ग्रामसेवक म्हणतात बांधकाम कामगार अर्ज नोंदणीकरीता आमच्या सहीचा अधिकार नाही? तर सही कोणाची घेणार?



पालोरा:  ग्रामीण भागातील महिला पुरुष कामगारांची नोंदणी व नुतनीकरण सहज सुलभ व तत्परतेने करा, असे शासकीय परीपत्रक असतांनाही काही गावातील ग्रामसेवक कामगारांना फार्मवर सह्या देत नसून विनाकारण हेलपाट्या मारायला लावतात. त्यामुळे कामगारांनी सह्या कोणाच्या घ्यायच्या, हा मोठा पेच निर्माण झालेला आहे.

महाराष्ट्र शासन इमारत व बांधकाम कामगारांना सध्या शासनाकडून गुहपयोगी वस्तुंचे वाटप सुरू असल्यामुळे नविन बांधकाम पासबुक किंवा नुतनीकरण करण्यासाठी ग्रामीण भागातील कामगार मोठ्या प्रमाणात नोंदणी करीता अर्ज भरत आहेत. परंतू मोहाडी तालुक्यातील परीसरातील ग्रामसेवक म्हणतात, 'आम्हाला सही देण्याचा अधिकार नाही. त्यामुळे कामगारांनी सही कोणाची घ्यावी', या संदर्भात शासनाने आदेश काढलापाहिजे व बांधकाम लाभार्थ्यांना कामगार नोंदणीपासून वंचित न ठेवता यासाठी शासनाने पुढाकार घेवून बांधकाम नोंदणीकरीता अडचण होऊ नये, अशी कामगारांची मागणी आहे.






शासकीय योजनांच्या गावाच्या हितासाठी शासकीय कर्मचारी म्हणून ग्रामसेवकांची निवड केली आहे आणि प्राधिकरण म्हणून ग्रामसेवक असतो व शासन निर्णयानुसार ग्रामसेवकाला सही मारण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे प्रश्न उद्भवत नाही. ग्रामसेवकाने नोंदणी अर्जावर सही मारण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होत नाही.

रितेश वासनिक सभापती, पंचायत समिती मोहाडी

Post a Comment

Previous Post Next Post