सिद्धार्थ साखरे आरमोरी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती केली आगळी-वेगळी साजरी...

- जयंतीनिमित्त महामानवाच्या प्रतिमा केल्या प्रदान

सत्यवान रामटेके(उपसंपादक)
"सुपरफास्ट न्यूज"

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची १३१ वी जयंती १४ एप्रिल रोजी सर्वत्र मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरी करण्यात आली असून जयंती दिनाचे औचित्य साधून आरमोरी येथील सिद्धार्थ साखरे एल आय सी गडचिरोली यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आगळी-वेगळी साजरी करून सर्वांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
सिद्धार्थ साखरे यांनी धानोरा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या तळेगांव शाळेतील मुख्याध्यापक विलास सिडाम व इतर ठिकाणी सदिच्छा भेट देऊन महामानव बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा प्रदान करून जयंती साजरी केली आहे.जयंती साजरी निमित्ताने तळेगांव शाळेचे मुख्याध्यापक शिडाम यांनी म्हटले की डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईने अवघा भारत देश सुरळीत चालू असल्याने सर्वत्र जगामध्ये महामानवाचा गुणगौरव गाऊन जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन आपली व देशाची प्रगती साधावी असे जयंती निमित्त सांगितले.
गुणवंत हेडाऊ जि प शाळा मुख्याध्यापक खरकाडा यांना सदिच्छा भेट

Post a Comment

Previous Post Next Post