ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, अपात्र होण्याचे नियम

चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य अपात्रतेच्या रडारवर

चंद्रपूर प्रतिनिधी :–
ग्रामीण जनतेच्या विकासासाठी गावातील ग्रामपंचायतीमध्ये लोकांकडून सदस्य व त्यानंतर सरपंचाची निवड केल्या जाते. ज्याप्रमाणे ग्रामपंचायतीला बळकटी देण्यासाठी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना अधिकार प्रदान केले आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कायद्याने ग्रामपंचायतीचा कारभार सुव्यवस्थेचा व्हावा म्हणून ग्रामपंचायतीचे पदाधिकारी असलेले सरपंच उपसरपंच सदस्य यांना कायद्याच्या चौकटीत राहून व त्या कायद्याने निर्गमित केलेले पात्रतेचे निकष कायम ठेवून आपले कर्तव्य जबाबदाऱ्या पार पाडावे लागतात, असे कर्तव्य पार पाडत असताना सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी कसूर केल्यास संबंधित अपात्रतेची तरतूद देखील कायद्यात आहे. या कायद्यांतर्गत चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्य़ातील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंचव सदस्य हे अपात्रतेच्या रडारवरअसून त्यांची माहिती काढल्यास अनेक सरपंच पायउतार होतील अशी शक्यात आहे त्याविषयी आपण माहिती पाहूया.

काय आहे सदस्य, उपसरपंच, सरपंच, अपात्रतेचे निकष?



ज्या व्यक्तीला अस्पृश्यता कायदा 1955/मुंबई दारुबंदी कायदा 1949 त्या स्वरूपाच्या कोणत्याही कायद्यनुसार दोषी मानले असून अपराधसिध्द झाल्या पासून 6 वर्षापर्यंत ती व्यक्ती अपात्र असते.
ज्या व्यक्तीला 6 महिने पेक्षा जास्त शिक्षा कोणत्याही कायद्यान्वये झाली असले व कारावासातून मुक्त झाल्यापास 5 वर्ष ती व्यक्ती अपात्र असते. राज्य शासन हा कालावधी कमी करू शकेल.ती व्यक्ती सक्षम न्यायालयाने विकल मनाची घोषित केली असेल तर. त्या व्यक्तीला नादार म्हणून घोषित करण्यात आले असेल व तिने नादारीतून मुक्तता मिळवली नसल्यास. तिला शासकीय/स्थानिक प्राधिकरणाच्या नोकरीतून गैरवर्तनावरुन बड़तर्फ करण्यात आले असून बडतर्फ केल्यापासून 5 वर्ष ती व्यक्ती अपात्र असते. ग्रामपंचायतीमध्ये कोणतेही लाभाचे पद धारण करीत असल्यास. ग्रामपंचायतीच्या कोणत्याही कामात/करारात/नोकरीत/त्या व्यक्तिचा स्वत.चा/भागीदारामार्फत प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष हिस्सा/ हितसंबंध असलेली व्यक्ती अपात्र असेल. त्या व्यक्तीने ग्रामपंचायतीला किंवा जिल्हा परिषदेला देय असलेली कर/फी ची रक्कम मागणी केल्यापासून 3 महिन्याच्या आत भरली नसल्यास (कर/फी थकीत असल्यास), शासकीय/ स्थानिक प्राधिकरणाचा कर्मचारी ग्रामपंचायत निवडणूकीस अपात्र असेल. दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्यास.



पुढीलपैकी एक प्रमाणपत्र सादर न करणारी व्यक्ती अपात्र असेल.


राहत्या घरात शौचालय असून त्याचा नियमित वापर करते. राहत्या घरात शौचालय नसून सार्वजनिक शौचालयाचा नियमित वापर करते.
स्वच्छेने परदेशी नागरिकत्व संपादन केलेली/ परदेशाशी निष्ठा राखण्याचे कबूल केलेली व्यक्ती ग्रामपंचायत सदस्य होण्यास अपात्र असते.जि.प. चा सदस्य/पं.स.चा सदस्य म्हणून निवडून आलेली व्यक्ती. शासकीय जमीन/सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमण केलेली व्यक्ती. सरपंच, उपसरपंच, सदस्य पदावरून काढल्याने अपात्र ठरलेली व्यक्ती अपात्रतेचा कालावधी संपेपर्यंत अपात्र असते.निवडणूक खर्च मुदतीत सादर न केल्यावरुन निवडणूक आयोगाने अपात्र ठरवलेली व्यक्ती. एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीर रक्कम दिल्याचे लेखा परीक्षण अहवालावरून दिसून आल्यास जिल्हाधिकारी ती रक्कमअधिभार म्हणून संबंधित व्यक्तीकडून वसूल करू शकतात. जिल्हाधिकार्ऱ्याने अधिभार म्हणून रक्कम भरण्याचे आदेश दिल्या नंतरही रक्कम अदा न करणारी व्यक्ती निवडणुकी करिता अपात्र मानली जाते.

ग्रामीण जनतेची कायदे बाबतची उदासीनता.

ग्रामपंचायत हे ग्रामीण जनतेचा अविभाज्य पाया मानला जातो. ग्रामसभेला कायद्याने अधिकचे अधिकार प्राप्त करून दिले आहे परंतु ग्रामीण जनतेत ग्रामपंचायतीच्या कायद्याबद्दल माहितीचा अभाव आपल्याला दिसून येतो. एखाद्या कायद्याबाबत जी माहिती असूनही ग्रामस्थांचा पाठिंबा किंवा एकजूट नसते. यामुळे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांद्वारे कायद्यातून पळवाटा काढल्या जातात असे असले तरीही शासनाने वेळोवेळी कायद्यात सुधारणा करून जनतेला किंवा ग्रामसभेला अधिक सक्षम आणि बळकटी दिली आहे. जेणेकरून त्या कायद्यांचा गैरकारभार होणार नाही किंवा त्यांच्यावर आळा बसेल. यासाठी सरपंच सदस्य किंवा उपसरपंच यांच्यापैकी जर कोणी आपल्या कर्तव्यात कसूर केल्यास त्यांना पदावरून कमी करण्यात येऊ शकते. तसेच सरपंच व उपसरपंच यांच्यावर अविश्वासाचा ठराव अधिक व माहितीचा अधिकार कायदा इत्यादी योग्य रीतीने वापर केल्यास आपल्याला हे चित्र बदलता येते. यासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने राहणे व कायद्याची माहिती असणे आवश्यक असते.





गावातील कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक सूचना :

आपले काम पारदर्शक ठेवा गावातील सर्वांना खुलेपनी सर्व माहिती सांगा. बैठक करताना खुल्या ठिकाणी करा. कोणाच्या घरात बंद भिंतीमध्ये नको.ग्रामसभेत, मासिक सभेत गावातील सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय प्रथम हाती घ्या. कुणाच्या वैयक्तिक फायद्याचा नको प्रशासन किंवा ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आपले शत्रू नाहीत. त्यांनी नियमानुसार कामे करावी एवढेच आपल्याला पाहिजे म्हणून प्रशासनातल्या कोणाशीही बोलताना शिव्या देऊ नका. त्यांच्या चुकूनही अपमान करू नका. हळूहळू त्यांच्याशी दोस्ती झाली तर आपलाच मार्ग प्रशस्त होणार आहे. संघटित होऊनच कायद्याच्या मार्गाने लढा एकट्यानेच लढुन पुढे जाता येत नाही. गावातील विरोधी गटाशी बोला त्यांना माहिती मिळाल्याने आपले नुस्कान होणार नसते, उलट त्यांचे सहकार्य मिळाले तर आपलेच काम सोपे होते.जेव्हा फायदा मिळण्याची वेळ येते तेव्हा आधी गावातल्या सर्वात गरीब माणसांचा विचार करा फायदा मिळविताना अन त्यांचा नंबर पहिला लागला पाहिजे आपला शेवटी. गावातील जुन्या माणसांना पुढार्‍यांना वडीलधाऱ्यांना मान द्या. त्यांना दुखावल्यामुळे आपल्या कामात अडचणी येतात. ग्रामसभेत जनजागृती करा. विविध संकल्पना राबवून ग्रामस्थांची ग्रामसभेतील सहभाग वाढवा. कायदा वाचा, ग्रामपंचायत सरपंच अपात्र नियम ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा.

Post a Comment

Previous Post Next Post