वडधा येथील आठवडी बाजार मुख्य रस्त्यावर भरत असल्यामुळे नागरिकांना होतो कमालीचा त्रास

वडधा :- आरमोरी तालुक्यातील वडधा येथील आठवडी बाजार हा वडधा- डार्ली या मुख्य मार्गावर भरत असल्यामुळे परिसरातील नागरिकांना तसेच दुचाकी व चार चाकी वाहन धारकांना ये-जा करण्यासाठी कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
या आठवडी बाजाराची व्यवस्था दुसऱ्या जागेवर करण्याची आवश्यकता आहे. आठवडी बाजार हा मुख्य रस्त्यावर भरत असून वडधा गावातील गुरे व म्हशींचे कळप सुद्धा याच मार्गाने जात असल्यामुळे येथे अनेकदा वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते.
गुरांच्या कळपा मुळे बाजारातील अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. अनेक नागरिक गुरांच्या कळपा मुळे जखमी झाले आहेत. भविष्यात या गुरांच्या कळपा मुळे येथे जीवितहानी सुद्धा होऊ शकते.
परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे बाजार इतरत्र हलविण्यासाठी अनेकदा तक्रारी केल्या, परंतु प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. असा आरोपही नागरिकांमधून केल्या जात आहे.
तरी ग्रामपंचायत प्रशासनाने या बाबीची दखल घेऊन आठवडी बाजाराची व्यवस्था पर्यायी जागेची उपलब्धता करून देण्यात यावी. अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post