देसाईगंज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भ्याड हल्ल्याचा केला जाहीर निषेध..!

सत्यवान रामटेके(उपसंपादक)
"सुपरफास्ट न्यूज"
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्राध्यक्ष,देशाचे सर्वेसर्वा शरचंद्र पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक निवासस्थानी दगडफेक करून भ्याड हल्ला करण्यात आला असल्याने या निषेधार्थ देसाईगंज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक(लाखांदूर टी पाइंट) याठिकाणी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला साक्ष ठेऊन घडवून आणलेल्या समाजकंटक यांना सद्बुद्धी देत अशी प्रार्थना करुन शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले व सदर हल्ल्याचा निषेध देसाईगंज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आला.
सदर घटना महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील अतिशय निंदनीय व शरमेची असून हल्ला घडवून आणण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्यांवर कठो कारवाई करण्यात यावी असाही जाहीर निषेध नोंदवला गेला.
शांततेत आंदोलन पार पाडतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटन सचिव युनूस शेख, संजय साळवे जिल्हा संघटन सचिव गडचिरोली, क्षितिज उके तालुकाध्यक्ष देसाईगंज,लतीफ शेख शहर अध्यक्ष देसाईगंज,विलास गोठेफोडे जिल्हा सचिव गडचिरोली,मनोज तलमले जिल्हा कार्याध्यक्ष ओ.बी.सी सेल गडचिरोली,भुवन लिल्हारे सांस्कृतिक विभाग जिल्हाध्यक्ष गडचिरोली,शैलेश पोटुवार ज्येष्ठ नेते,राशीद उल हक ज्येष्ठ नेते,रोशन शेंडे तालुका उपाध्यक्ष,खुर्शीद शेख जिल्हा सरचिटणीस,जयेश बन्सोड जिल्हा संघटक सचिव,समीर पठाण  विधानसभाध्यक्ष आरमोरी,केतन राऊत जिल्हा सचिव, चिराग भागडकर युवक तालुकाध्यक्ष देसाईगंज, आवेश पठाण तालुका उपाध्यक्ष युवक देसाईगंज, इमरान शेख शहर अध्यक्ष युवक देसाईगंज,प्रशांत देवगिरीकर युवक कार्याध्यक्ष देसाईगंज,आतिश कोहचाडे युवक कार्याध्यक्ष देसाईगंज, कपिल बोरकर मीडिया ता.ध्यक्ष देसाईगंज, अविनाश राघोर्ते,बिट्टू सोनेकर,अशिफ शेखानी,नामदेव वसाके तालुका सरचिटणीस,विनोद राऊत,जावेद पठाण आणि समस्त रा.काँ.पक्षाचे कार्यकर्ता उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post