*महापुरुषांच्याच विचारांमध्ये स्त्रियांना प्रगतीच्या वाटा सापडतील*, ------- तारका जांभुळकर यांचे वक्तव्य

गडचिरोली:- बौध्द समाज अयोध्या नगर च्या वतीने दि.14/04/2022 रोज गुरुवारला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सामूहिकरीत्या साजरी करण्यात आली . कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदनेने करण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मा. छन्ना जनबंधू वकिलसाहेब, मा.प्रेमकिशोर गेडाम , मा. छायाताई गेडाम, मा. हंसराज उंदिरवाडे , मा. देवानंद गेडाम, मा. हर्षलता दरडमारे, मा. बारसिंगे ताई , प्रमुख मार्गदर्शक मा. तारका जांभुळकर , कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. आरती जनबंधू प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन मा.सोनाली वैद्य यांनी केले, तर आभार दमयंती तेलसे यांनी मानले.
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनात संघर्ष करून भारतीय समाज मनात समता, स्वातंत्र्य, आणि बंधुत्व रुजवले, संविधानाच्या माध्यमातून एकसंघ भारत घडविला, बाबासाहेबांचे मौलिक विचार जगण्यास व जगविण्यास कायम प्रेरणादायी ठरतील, त्या विचारांना जिवंत ठेवणे ही आपली जबाबदारी आहे*,
*सामाजिक चळवळ पुढे नेण्यासाठी तरुण पिढीने प्रयत्न करावे* , असे मान्यवरांनी मार्गदर्शनातुन विचार व्यक्त केले.
सकाळी 9.00 वाजेपासून सायंकाळी 9.00 वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. *लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा यासारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते* .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मा. विद्या वाळके, मा.अर्चना उंदिरवाडे, मा. सुनीता मेश्राम, यांनी भरपूर परिश्रम घेतले,
सायंकाळी धम्मरॅली काढण्यात आली .
*अत्यंत शांत व उत्साहपूर्ण वातावरणात जयंतीदिनाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला.*

Post a Comment

Previous Post Next Post