दोन दुचाकीच्या समोरासमोर धडकेत एक युवक जागीच ठार, तर दुसऱ्या दुचाकीवरील युवक गंभीर जखमी

कुरखेडा : देसाईगंज मार्गावरील कसारी फाट्याजवळ दोन दुचाकी वाहनांची समोरासमोर धडक बसल्याने दुचाकीवरील एक युवक जागीच ठार, तर दुसऱ्या दुचाकीवरील युवक गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली.

अपघातात गेवर्धा येथील नाट्य कलावंत व सलून व्यावसायिक यशवंत नारायण दाणे (वय ३८) हे जागीच ठार झाले, तर अर्जुणी तालुक्यातील कन्हाळगाव येथील तुळशीदास भारद्वाज (वय २२) या दुचाकीस्वार युवकाच्या पाय, हातास गंभीर दुखापत झाली आहे. त्याला उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहीती मिळताच भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये रुग्ण कल्याण समितीचे सदस्य सिराज पठाण, प्रा. विनोद नागपूरकर यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. जखमीची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. विशेष म्हणजे दोघांनी हेल्मेट घातले नव्हते. हेल्मेट घातले असते तर प्राण वाचले असते.

Post a Comment

Previous Post Next Post