अतिरिक्त जिल्हाधिकारी यांचे ट्रॅक्टरचे सायलन्सर गरम असल्याने भाजले हात


कोठारी /तोहोगाव : चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव उदयास आलेली गोंडपिपरी तालुक्यातील पाचगाव वनहक्क समितीच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रमशील वनहक्क दाव्यातंर्गत राखीव जंगलात सुरु असलेल्या कामाची पाहणी करण्याकरिता अतिरिक्त जिल्हाधिकारी यांचा नियोजित दौरा होता. महिना भरापासून संततधार बरसत असलेल्या पावसामुळे चिखलमय रस्ते तुळविण्यापेक्षा त्यानी ट्रॅक्टरने प्रवास करून कामाची पाहणी करण्याकरिता मार्ग निवडला. आणि दोन ते तीन कि.मी.चा प्रवास करीत कामाची पाहणी केली व जंगल व्याप्त गाव आणि ट्रैक्टर सफारीचा मनमुराद आनंद लुटला. परत गावात आल्यानंतर ट्रैक्टरवरुन खाली उतरते वेळी ट्रॅक्टरच्या सायलन्सरचा आधार घेत उतरण्याचा प्रयत्न करित असतांना जंगलात फिरुन तप्त झालेल्या ट्रैक्टरच्या सायलेंन्सर मुळे चटका बसला आणि त्यांचा हात भाजल्याची घटना जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत खेडतकर याचे सोबत पाचगाव येथे घडली
पाचगाव येथे जिल्ह्यातील अग्रगण्य वनहक्क समिती असून त्याच्या माध्यमातून अनेक कामे केल्या जातात. विदेशातुन व वेगवेगळ्या राज्यातून येथे कार्यरत कामाची पाहणी करण्यासाठी व केलेल्या कामाची माहिती अवगत करण्यासाठी नैमित्याने नियमित नागरिक येत असतात. प्रत्यक्ष केलेल्या कामाची मौका तपासनी करण्याकरिता अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत खेडतकर आल्या होत्या. महिन्या भरापासून सतत पाऊस सुरु असल्याने चिखलमय रस्ते झाले असल्याने त्या ट्रॅक्टर वर बसून दोन ते तीन किमी चा प्रवास करून कामाची पाहणी करण्याकरिता गेल्या. उतरते वेळी त्यांनी ट्रॅक्टर सायलन्सर चा आधार घेतला. आणि अघटीत घडले. जंगलातून फिरून आल्याने ट्रॅक्टर चे सायलन्सर गरम असल्याने ते झोंबले अन त्यांचा हात भाजला. त्यामुळे अनावधानाने घडलेला प्रकार व त्यातून झालेली दुःखद यातना या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांना सहन करावी लागली.

Post a Comment

Previous Post Next Post