या पोलिस स्टेशनची जबाबदारी आहे सापावरती

इडुक्की, : केरळमध्ये पोलिसांना आपल्या आणि पोलीस स्टेशनच्या सुरक्षेसाठी साप ठेवावे लागले आहेत. ऐकायला ही बातमी विचित्र वाटत असली तरी त्याचं कारणही तसंच आहे. या पोलीस स्टेशनमध्ये सध्या ठिकठिकाणी सापच दिसत आहेत. केरळमधल्या या भागात दोन आठवड्यांपूर्वी एका बिबट्याने आदिवासी व्यक्तीवर हल्ला केला, तेव्हा या व्यक्तीने कुऱ्हाडीने बिबट्यावर वार केला. पोलिसांना ठाण्यात साप ठेवण्याची कल्पना स्थानिक व्यक्तीने दिली, जो आधीपासून ही आयडिया वापरत होता.

पोलिसांवर पूर्ण समाजाची सुरक्षा करण्याची जबाबदारी असते, पण जर पोलिसांना कधी सुरक्षेची गरज पडली तर त्यांची मदत कोण करणार? केरळच्या इडुक्की इथल्या एका पोलीस स्टेशनमध्ये सापांची फौज सुरक्षारक्षक म्हणून तैनात करण्यात आली आहे. इडुक्कीमध्ये डोंगरावर हे पोलीस स्टेशन आहे. पोलीस स्टेशनच्या चारही बाजूंना जंगल आहे.जंगल असल्यामुळे कुंबुम्मेट्टू पोलीस स्टेशनमधल्या पोलिसांना माकडं मोठ्या प्रमाणावर त्रास देत आहेत. माकडांच्या त्रासापासून सुटका होण्यासाठी पोलिसांना आता फक्त सापांकडून अपेक्षा आहे.

हे पोलीस स्टेशन केरळ-तामीळनाडू सीमेवर आहे. पोलिसांनी सुरक्षेसाठी ठेवलेले हे साप खरे नसून चीनमध्ये बनलेले रबराचे आहेत. पोलीस स्टेशनमध्ये साप ठेवण्याच्या आधी माकडं हैदौस घालून जंगलात पळून जायची, पण आता साप ठेवण्याची आयडिया कामाला आली आहे. पोलीस स्टेशनमध्ये साप ठेवल्यामुळे माकडांचा उच्छादही कमी झाला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post