*रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते गावकऱ्यांना प्रश्न मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष.*

 रस्त्याचा व्हिडियो

👇👇👇👇👇👇👇👇



उराडी :- कुरखेडा तालुक्यातील उराडी- मोहाडी या रस्त्याची अवस्था दयनीय झालेली आहे या मार्गावर गेले असता रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते असा नागरिकांना प्रश्न पडत आहे सातत्याने मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील बहुतांश भाग वाहून गेलेला आहे त्यामुळे या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात खोल खड्डे पडलेले आहेत व या खड्ड्यांची डागडूजी करण्यात आलेली नाही या मार्गावर ये-जा करणाऱ्या नागरिकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे तर अपघात होण्याची वाट प्रशासन बघत आहे का असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे सदर मार्गाची दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात यावी अन्यथा गावकऱ्यांतर्फे सदर विभागाच्या कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल असा इशारा  गावकऱ्यांनी दिलेला आहे.







Post a Comment

Previous Post Next Post