रामाळा येथील वाघाच्या हल्ल्यात आनंदराव पांडुरंग दूधबळे ठार

 आरमोरी तालुक्यातील रामाळा येथील वाघाच्या हल्ल्यात आनंदराव पांडुरंग दूधबळे वय 55 वर्ष ठार झाल्याची घटना आज अंदाजे सकाळी 10 वाजताच्या दरम्यान घडली.
रामाळा येथील रहिवासी असलेले आनंदराव पांडुरंग दूधबळे वय 55 वर्ष हे आपल्या 5 सहकाऱ्यांसोबत वैरागड रोडवर असलेल्या रामाळा बीट क्रं 14 जंगलामध्ये शिंधी तोडायला गेले होते. सिंधी तोडत असताना मागेहुन दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून 3 किलोमिटर अंतरावर फरकडत नेऊन त्यांना ठार केल्याची माहिती मिळताच सरपंच संघटनेचे अध्यक्ष संदिप ठाकुर नगरसेवक मिलिंद खोब्रागडे रयत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दिलीप घोडाम यांनी जंगलातील घटना स्थळ गाडुण वारंवार होत असलेल्या घटनांवर वनविभाग नरभक्षक वाघाला बंदोबस्त करण्यास फेल ठरत असल्यामुळे रोष निर्माण केला शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेले असता पन्नास हजार रुपये अंत्यविधी साठी मृतकाच्या कृटुबाला दिल्या शिवाय दवाखान्यातून शवविच्छेदन केलेले प्रेत हलविले नाही व नरभक्षक वाघाचा बंदोबस्त दोन दिवसात करा अन्यथा वनपरीक्षेत्र कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना घेराव करणार असाही इशारा देण्यात आले वेळी रामाळा येथील नागरीक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post