बापरे बाप...ग्रामपंचायतचा शिपाईच बनला ग्रामसेवक...


कुरखेडा, 20 ऑक्टोबर : तालुका मुख्यालयापासून 2 कि.मी.अंरावर असलेल्या कुंभीटोला येथील ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक नसल्याने तेथील पदभार सध्या श्रीमती डोंगरवार यांच्याकडे आहे. परंतु डोंगरवार यांच्याकडे दोन ग्रा.पं.चा कारभार असल्याने त्या वेळोवळी कुंभीटोला येथे येऊ शकत नाही. याबाबत ग्रामविस्तार अधिकारी यांना विचारणा केली असता त्यांनी कानाडोळा करत दुर्लक्ष केले. या ग्रा.पं. परीसरात चालु असलेले कामे स्वच्छता, पाणीपुरवठा, इत्यादी गोष्टी येथील शिपाई पाहतो. गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानची ऐशीतैशी झालेली आहे. जागोजागी कचऱ्याचे ढीग जमा झाले असुन परीस्थिती अस्तव्यस्त झाली आहे. तसेच येथील संगणक परीचालक सुध्दा महीन्यातुन एक किंवा दोन दिवस येतो व पूर्ण मानधन घेतो. त्यामुळे नागरिकांचे काम खोळंबुन नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

सदर ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक देण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post