एका अल्पवयीन मुली सोबत मोबाईलवर काढलेल्या अश्लील फोटोच्या आधारे ब्लॅकमेल करुन गेल्या चार वर्षापासून अनैतिक संबंध ठेवणाऱ्या तरुणाला अटक

भंडारा :- साकोली तालुक्यातील एका अल्पवयीन मुली सोबत मोबाईलवर काढलेल्या अश्लील फोटोच्या आधारे ब्लॅकमेल करुन गेल्या चार वर्षापासून अनैतिक संबंध स्थापित केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

प्राप्त माहितीनुसार आरोपी हा बामपेवाडा येथील रहिवासी असलेला हर्षदीप मुकुंद नंदेश्वर वय 19 वर्ष असून बामपेवाडा येथे चार वर्षांपूर्वी झालेल्या एका लग्नात अल्पवयीन मुलीच्या संपर्कात आला व त्याने मुलीशी प्रेम संबंध स्थापित करून तिच्या काही अश्लील फोटो मोबाईल मध्ये काढून घेतले यानंतर मुलीला सतत ब्लॅकमेल करून आपले संबंध स्थापित करुन पिढीतला शारीरिक व मानसिक रित्या छळ करण्याचा प्रकार सुरू ठेवला होता.एक दिवस आई घरी नसल्याचे समजून आरोपी हर्षदीप हा अल्पवयीन पीडित मुलीच्या घरी गेला व तिला एकटी पाहून अश्लील चाळे करायला लागला.इतक्यात घरातच असलेल्या पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने हे सगळे बघितले व मुली सोबत पोलीस स्टेशन गाठले तेव्हा फिर्यादी पीडित मुलीच्या तक्रारीवरून साकोली ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांनी सदर प्रकरणाची गंभीरतेने दखल घेऊन तक्रार दाखल केली व तातडीने आरोपी हर्षदीप नंदेश्वर ला अटक करून पोस्को,आयटी अॅक्ट, ब्लॅकमेल, कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post