लफडे करणाऱ्या पत्नीला पोटगीचा अधिकार नाही - उच्च न्यायालय

चंदीगड :- घटस्फोटाच्या निर्णयासंबंधी अपील फेटाळून लावत पंजाब-हरयाणा उच्च न्यायालयाने महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. पत्नी जर व्यभिचारी असेल तर तिला पोटगी मागण्याचा अधिकार. नसेल, असे म्हणत कोर्टाने कौटुंबिक कोर्टाचा निर्णय कायम ठेवला.

हरयाणाच्या अंबाला फॅमिली कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात एका महिलेने पंजाब-हरयाणा उच्च न्यायालयात अपिल केले होते. घटस्फोटासंबंधी ही याचिका होता. तिच्या पतीने सुनावणीदरम्यान पत्नीकडून अत्याचार होत असून तिच्या शिव्या खाव्या लागत असल्याचे सांगितले होते. त्याशिवाय पतीने पत्नीवर गंभीर आरोप करत अंबाला जेलमध्ये असलेल्या उप अधीक्षकासोबत तिचे संबंध असल्याचे कोर्टाला सांगितले होते. त्यामुळे डीपीसीपींनी आपल्या तपासात ही व्यभिचाराची केस असल्याचे स्पष्ट केले.

 अंबाला कोर्टाने घटस्फोटाचे प्रकरण मंजूर केले होते. सदर महिलेने आपल्याला पतीकडून पोटगी मिळावी, अशी मागणी केली होती. महिलेने पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात अपिल केले. उच्च न्यायालयाने खालच्या कोर्टाचा निर्णय कायम ठेवत व्यभिचारी पत्नीला पोटगीचा अधिकार नसल्याचे अधोरेखित केले आहे. न्यायालयाने पोलिसांनी केलेल्या तपासाचा हवाला देत व्यभिचारावराची टिपण्णी केली आणि पोटगीची मागणी फेटाळून लावली.


Post a Comment

Previous Post Next Post