देशातील ८० कोटी बहुजनांना भिकेकंगाल बनवण्याचे षड्यंत्र

देशातील ८० कोटी बहुजनांना भिकेकंगाल बनवण्याचे षड्यंत्र



रमण परमार यांचा ब्राम्हणी व्यवस्थेवर हल्लाबोल
लखनौ: देशात आजपर्यंत ३० कोटी लोक उपासमारीचे बळी ठरले आहेत. तर देशातील ८० कोटी लोकांना भिकेकंगाल बनवण्याचे षड्यंत्र आखण्यात आल्याचा हल्लाबोल रमण परमार यांनी ब्राम्हणी व्यवस्थेवर केला आहे. भारत मुक्ती मोर्चाच्या १२ व्या राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते.



परमार म्हणाले, देशातील मूलनिवासी बांधवांना एका विचाराने संघटित होऊनच मोठी लढाई लढावी लागेल. त्यातूनच आपल्या समस्या सुटू शकतात. कारण देशात विदेशी ब्राम्हणांची सत्ता आहे. म्हणून ओबीसी, एससी, एसटी आणि मायनॉरिटीवर अन्याय-अत्याचार होत आहे. अमर्त्य सेन यांनी मौर्य काळातला इतिहास वाचला आणि मौर्यकाळात ३१ टक्के जीडीपी होता असे सांगितले. मूलनिवासी असंघटित कोणामुळे झाले? तर सम्राट बृहद्रथाची हत्या केल्यावर आपण सारे विस्थापित झालो.



त्या काळातील सोशल मीडिया म्हणजे बुद्धांच्या काळातील भिक्खू आणि बुद्ध धम्माचे प्रचारक व प्रसारकांच्या हत्या करण्यात आल्या. म्हणून वर्तमानातील ब्राम्हण पुन्हा एकदा मूलनिवासींनी एकत्र येऊ नयेत म्हणून असंघटित करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज ८० कोटी बहुजनांना भिकेकंगाल बनवण्याचे षड्यंत्र आखले गेले आहे. उपासमारीने टोक गाठले आहे. 



२०२२ मध्येही देशात ३० कोटी लोक उपासमारीच बळी ठरले आहेत. ८० करोड लोक हे दारिद्रय रेषेखालील जीवन जगत आहेत. जाणूनबूजून या देशावर उपासमारी लादण्यात आली आहे. धर्माच्या नावावर गुलामी आणू पाहत आहे. ओबीसी, एससी, एसटी लोकांकडे कामाची कार्यक्षमता नाही असे ते सांगतात. त्यातून ते लोकांना भ्रमित करत आहेत. देवदेवतांच्या नावाखाली अंधश्रद्धा पसरवल्या जात आहेत. या विषारी विचार धारेला संपवण्यासाठी देशातील बहुजनांना एकजुट होऊन लढावे लागणार आहे. एकत्रित न येण्यासाठी बहुजन लोकांचे जातीपातीत विभाजन केले आहे.



बामसेफ ही सामाजिक संघटना ४४ वर्षापासून या देशात जातीजोडो काम करत आहे. ओबीसींची ५२ टक्के लोकसंख्या असतानाही या ब्राम्हणांनी आरक्षण मिळू दिले नाही. भारत देश जगाला अन्न पुरवणारा असताना लोकांना भूकेने ब्राम्हणांनी मारले आहेत. अन्नाची टंचाई नसतानाही अन्नटंचाई निर्माण करण्यात आली आहे. ४० कोटी लोकांकडे अन्नटंचाई आहे. म्हणून लोकांना उपासमारीने मरावे लागत आहे. इतके ते कपट-कारस्थान करणारे लोक आहेत. देशातील मालमत्ता त्यांनी लुटली असल्याचे परमार यांनी निशाणा साधला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post