फरक आहे फक्त शेपटीचा.

फरक आहे फक्त शेपटीचा.


आपले महाराष्ट्र जागृत जनमंच माझे, तुमचे स्वताचे विचार व कार्यासाठी माध्यम आहे.व्यक्ती विकास व व्यक्ती अभिव्यक्ती साठी सोशल मेडिया वर आपण मित्र आहोत.इतिहास आणि धर्म शिकवणे किंवा बातमी देण्यासाठी नाहीत.बातमी द्यायची असेल तुमचा कामाची , तुमच्या विचारांची द्या.इतिहास तर आपण शाळेत शिकलो आहोत.
इतिहास किंवा इतरांची बातमी देण्यासाठी हे व्यासपीठ नाही.इतिहास तर कोणीही शिक्षक शिकवतो.बातमी पत्रकार देतो.पेपर देतो.टिव्ही देतो.आपण त्याव्यतिरिक्त संवाद करण्यासाठी मित्र बनलो आहोत.आपण त्यासाठी जनमंच बनवला आहे. जागृत माणसांचा जागृत जनमंच आहे.संवेदनशिल, कृतीशील माणसांचा जनमंच आहे.
कोणी कोणी येथे देवादिकांची फोटो टाकतात.देव , ईश्वर यांचे ज्ञान तर प्रत्येक माणसाला आहे.फक्त तुम्हालाच नाही.भक्ती तर प्रत्येक माणूस करतो.फक्त तुम्हीच नाही.पण त्याचे येथे प्रदर्शन नको.
येथे तुमच्या बुद्धीचे,ज्ञानाचे,नितीचे,कृतीचे दर्शन झाले पाहिजे.जे तुमच्या आमच्या दैनंदिन जिवनावश्यक आहे.
  मा.भगतसींग कोशीयारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचेवर बोलण्याची गरज आहे का?ते इतिहासाचे शिक्षक, प्रोफेसर,रीडर,संशोधक आहेत का?त्यांना महाराष्ट्र सरकार वर राजकीय, शासकीय, प्रशासकीय कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यपाल बनवले कि आम्हाला इतिहास भुगोल शिकवण्यासाठी? मा.राहूल गांधी यांनी स्वातंत्र्य वीर सावरकरांबाबत आम्हाला शिकवू नये.ते इतिहासाचे शिक्षक, प्रोफेसर,रीडर, संशोधक आहेत का?सावरकर हे काही राहूल गांधींचे प्रतिस्पर्धी नाहीत.तरीसुद्धा विनाकारण भिंतीला तुमड्या लावू नये. चंद्रकांत पाटील किंवा मंगलप्रभात लोढा अशा लोकांनी इतिहास वर बोलू नये.ते खरेच तितके बुद्धीमान किंवा अभ्यासू आहेत का?मंत्रीपदाची जबाबदारी इमानदारीने पार पाडण्याऐवजी मांजरी हुसकावत आहेत.का?का?कारण यांना माहिती आहे कि, महाराष्ट्रातील तथाकथित समाजसेवक किंवा राजकारणी भडकतील.आंदोलने करतील.उथळ बुद्धी चे लोक आपले पुतळे जाळतील.फोटोला चप्पलने मारतील.पेपरला ,टिव्ही ला बातमी येईल.प्रसिद्धी होईल.अशा दुष्ट हेतूने ही मंथरा गुणवत्तेची माणसे असे उपद्व्याप करतात.आणि आम्ही माणसारखी दिसणारी माकडे थैमान घालतो.टोपी विकणाऱ्या ने स्वताची टोपी काढून फेकली कि माकडे सुद्धा तशीच टोपी काढून फेकतात.ही गोष्ट या नेत्यांनी प्रयोगात आणली आहे.
     नरेंद्र मोदी चांगले कि राहुल गांधी चांगले? फडणवीस चांगले कि ठाकरे चांगले?पवार चांगले कि पटोले चांगले?हे कशावरून ठरवतो?.यापैकी कोण माझ्या जळगावचे , माझ्या गावचे रस्ते,पाणी,वीज,गटार, आरोग्य,शिक्षण बाबत कामी आले आहेत?जर हे आपल्या जळगाव चा विचार विकासाच्या दृष्टीने न करता लुटमारीच्या दृष्टीने करीत असतील तर उगाच स्तुती करू नये.उदाहरण सांगतो.राहूल गांधी आले गेले.धुमकेतू सारखे जळगाव जिल्ह्यातील सीमेला खेटून गेले.त्यांच्या येण्याने जाण्याने माझ्या जळगाव मधे काय फरक पडला?मोदी, फडणवीस किंवा ठाकरे किंवा पवार किंवा राऊत जळगाव ला आले आणि गेले.माझ्या जळगाव मधे काय फरक पडला?ठाकरे मुख्यमंत्री झाले.जळगाव मधे काय विकास झाला? शिंदे मुख्यमंत्री झाले.जळगांव मधे काय फरक पडला? अजितदादा आले गेले.सुप्रिया सुळे आले गेले.जळगाव मधे काय फरक पडला? मला वाटते काहीच फरक पडला नाही.जळगाव मधील रस्ते बदलले नाहीत.भ्रष्टाचार कमी झाला नाही.उलट जळगाव मधून काही लुटून नेता येईल का?उलट यांचे रेतीचे डंपरचे नंबर कलेक्टर व एसपीला देऊन गेलेत. इतकाच विचार आणि प्रयत्न यांनी केला आहे.मुंबई किंवा दिल्लीमध्ये. मशाल मधे घडाभर तेल टाकले असेल.पण जळगाव मधे अंधार राहिला असेल तर यांचे कौतुक का करावे?असे फालतू कौतुक करणे आमची गुलामगिरी मानसिकता आहे.कोणीही मुसकडा जळगाव ला येतो.उलटे सुलटे बोलतो.खरे खोटे आश्वासन देऊन जातो. बिनडोक म्हणा किंवा गुलाम म्हणा ढोल वाजवतात,नाचतात.या ढोल वाजवणाऱ्यांमधे आणि माकडांमधे काय फरक आहे? फक्त शेपटीचा.

... शिवराम पाटील 
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव 

... शिवराम पाटील

Post a Comment

Previous Post Next Post