शिक्षकाचा चमत्कार.... दारू पिऊन वर्गातच सू.... सू केला



गोंदिया, : जिल्ह्यात मद्यपी शिक्षकाचा संतापजनक प्रताप पहायला मिळाला आहे. या शिक्षकाने चक्क दारू पिऊन शाळेत हजेरी लावली. मद्याने झिंगलेले शिक्षक शाळेतील वर्ग खोलीत फरशीवर आडवे झाले. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विद्यादानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकाने यथेच्छ मद्यप्राशन करून शाळेत प्रवेश केला. इतकंच नाही, तर त्यांनी वर्गातच लघुशंका केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. हा सर्व प्रकार गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव पंचायत समितीच्या अंतर्गत येणाऱ्या निंबा येथील प्राथमिक पूर्व माध्यमिक शाळेत गुरुवारी घडला. आर. जी. मरस्कोल्हे असे मद्यधुंद शिक्षकाचे नाव आहे. यानंतर मद्यधुंद शिक्षकाला ग्रामीण रुग्णालयात दाखल करून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

विद्येच्या मंदिरातच हे झिंगाट शिक्षक झोपले असल्याबाबत शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना शाळेत बोलावले, हा प्रकार पाहताच पालकांनाही धक्का बसला आहे. पालकांनी यांची तक्रार मोठे अधिकारी यांच्याकड़े केल्याचे समजत आहे. मिळालेल्या माहितीनुसार दरम्यान, पोलिसांनी या शिक्षकाविरूद्ध गुन्हा दाखल केला असून मद्यपी शिक्षकावर गोरेगाव ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहे. शिक्षण विभागाने याची तात्काळ दखल घेत चौकशीचे आदेश दिले होते. गोंदिया जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी मद्यपी सहायक शिक्षक घनश्याम मरस्कोल्हे याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीत सदर मरस्कोल्हे हा शिक्षक 16 नोव्हेंबरपासून सातत्याने गैरहजर असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post