राष्ट्रीय ग्राहक दिन २७ डिसेंबर रोजी आयोजन




गोंडवाना सभागृह तहसील कार्यालय गडचिरोली येथे आयोजित 

गडचिरोली:-  शासन निर्णयान्वये दिनांक २४ डिसेंबर हा दिवस “ राष्ट्रीय ग्राहक दिवस’’ म्हणून साजरा करण्यात येतो, त्याअनुषंगाने दिनांक २४ डिसेंबर २०२२ शनिवार हा शासकीय सुट्टीचा दिवस असल्यामुळे “ राष्ट्रीय ग्राहक दिनाचा’’ कार्यक्रम दिनांक २७ डिसेंबर २०२२रोजी सकाळी ११.३० वाजता गोंडवाना सभागृह,तहसिल कार्यालय परिसर गडचिरोली येथे जिल्हास्तरीय “ राष्ट्रीय ग्राहक दिनाचे ’ आयोजन करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमामध्ये ग्राहक जनजागृती करण्याबाबत प्रर्दशन तसेच इतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.तरी नागरीकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post