रस्ता सुरक्षा सप्ताह' निमित्त केशोरी पोलीस स्टेशनने आयोजित केली भव्य 'निबंध लेखन स्पर्धा'


केशोरी:-;नक्षलग्रस्त आदिवासी भागातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांच्या अंगातील अंतर्गत कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील सुप्त गुणांना चालना मिळावी या उद्देशाने रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन केशोरी परिसरातील डॉ. राधाकृष्ण विद्यालय केशोरी, नवोदय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय केशोरी, विदर्भ कनिष्ठ महाविद्यालय केशोरी येथील विद्यार्थी यांच्या साठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये १) वाहतुक सुरक्षा २) मोबाईलचा वापर ३) स्वच्छतेचे फायदे व ४) व्यसनाधिनता या विषयाचा समावेश करण्यात आला होता. सुमारे १३५ विद्यार्थ्यांनी सदर निबंध स्पर्धेत सहभाग घेऊन निबंध लिहला.


या निबंध स्पर्धेत कु. रिया एकनाथ समरित, नवोदय विद्यालय केशोरी हिने प्रथम क्रमांक, श्रिकांत लोमाप्रकाश शहारे विदर्भ क.महाविद्यालय कनेरी याने द्वितीय क्रमांक तसेच शुभम विनोद गहाने याने तृतीय क्रमांक पटकाविला. या विद्याथ्र्यांना दि. 17/01/2023 रोजी पोलीस स्टेशन केशोरी आयोजीत बक्षिस वितरण समारंभात केशोरी पोलीस ठाणेचे ठाणेदार सोमनाथ कदम यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी तिन्ही शाळेतील उत्कृष्ठ तिन विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रोत्साहनपर प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.


सदर बक्षिस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणुन पोलीस ठाणे केशोरी ठाणेदार सोमनाथ कदम साहेब, सपोनि जोहेब शेख, श्री काटगाये सर, प्राचार्य नवोदय विद्यालय केशोरी, श्री लाई सर, डॉ. राधाकृष्ण हाय. कनेरी/केशोरी, प्रा. राऊत सर विदर्भ कनिष्ठ महा. कनेरी/केशोरी, पोलीस हवालदार सुशिल रामटेके, दिपक खोटेले, पो.शि.नितीन डुंभरे उपस्थीत होते. मा. ठाणेदार कदम साहेब यांनी उपस्थीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून वाहतुक नियमांचे पालन करून अपघात टाळावे, व्यसनाधिनता, महिला व बालकांची सुरक्षा व स्पर्धा परिक्षा या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

तसेच पुढील काळात पोलीस ठाणे केशोरी तर्फे वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, व्हॉलीबाल स्पर्धा आयोजीत करण्यात येणार असून, जास्तीत जास्त विद्याथ्र्यांनी सदर स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

सदर स्पर्धा मा. पोलीस अधिक्षक गोंदिया श्री निखिल पिंगळे साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक गोंदिया कैम्प देवरी श्री अशोक बनकर साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी श्री संकेत देवळेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन केशोरीचे ठाणेदार श्री सोमनाथ कदम यांच्या संकल्पनेतून सपोनि. जोहेब शेख. पोलीस हवालदार सुशिल रामटेके, दिपक खोटेले, पोलीस अंमलदार नितीन डुंभरे तसेच केशोरी पोलीस ठाणेचे अंमलदार यांनी पार पाडले. पोलीसांच्या या उपक्रमांचे केशोरी परीसरात कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post