ठेवला रे ठेवला शाळेत रोजंदारी शिक्षक ठेवला


घुग्घुस (चंद्रपूर) : एका राजकीय (Political) पक्षाचा प्रदेश उपाध्यक्ष (StateVice President) असलेल्या शिक्षकाचा (Teacher) महा कारनामा पुढे आला आहे. राजकारणासाठी वेळ देता यावं, म्हणून या शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी ( Teach Students) आपल्या जागेवर चक्क रोजंदार ठेवला. शिक्षकाच्या या "विवेक" शील करणाम्याची चर्चा शहरात रंगली आहे या प्रकारावर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.


शिक्षण पवित्र कार्य. शिक्षकांना गुरु म्हटलं जातं. उद्याची भावी शिक्षक घडवीत असतात. मात्र एका शिक्षकाने शिक्षककी पेशाला काळीमा फासण्याचा प्रकार घुग्घुस येथे घडला आहे. घुग्घुस (Ghugus) येथून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेत (School) एका राजकीय पक्षाचा प्रदेश उपाध्यक्ष असलेला नेता पाच वर्षांपूर्वी या शाळेत शिक्षक पदावर रूजू झाला. मात्र विद्यार्थ्यांना शिकविण्याचे कार्य न करता तो पूर्णवेळ राजकारणात सक्रिय असायचा. कर्तव्यावर न जाता फुकटचा पगार घेऊ लागला. यासाठी या शिक्षकाने भरी युक्ती अमलात आणली. शहरातील एका बेरोजगार युवकाला स्वतःच्या जागी शिक्षक म्हणून शिकविण्यास पाठवू लागला. मोदल्यात दरमहा पंधरा हजार रुपये तो देत असे. सोबतच जाण्या-येण्यासाठी दुचाकीची व्यवस्था त्याने करून दिली.

आज काही सामाजिक कार्यकर्ते शाळेत गेले. आणि शिक्षकाचे बिंग फुटले. सामाजिक कार्यकर्त्यांना बघून "शुभम" पळून गेला. या प्रकारामुळे पालकात संताप व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यात या शिक्षण संस्थेच्या शाळेत अनेक भोंगळ कारभार सुरू असल्याची चर्चा आता शहरात रंगली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post