बनवशील बनवशील नकली दारू बनवशील...


चंद्रपुर :- बनावट देशी दारू एका कारखान्यात Duplicate Country Liquor तयार होत असल्याच्या गोपनीय माहिती नुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने मूल तालुक्यातील चितेगाव येथील ए. व्ही. जी. गोट फार्म या शेळी प्रशिक्षण संस्थेच्या गोडाऊनमध्ये धाड टाकली असता त्याठिकाणी अवैध बनावट देशी मद्य तयार करण्याचे साहीत्य, द्रावण असा एकूण १६,५०,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून यातील आरोपी पवन उर्फ गोलू वर्मा व राजू शामराव मडावी हे दोघेही फरार आहेत. Excise Raid

राज्य उत्पादन शुल्क, चंद्रपूर चे अधीक्षक संजय पाटील यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मुल यांनी दिनांक २५/०१/२०२३ रोजी मुल- सिंदेवाही रोडवरील, चित्तेगाव च्या हद्दीत एल्गार समिती संस्था कला वाणिज्य महाविद्यालयाला लागून असलेल्या ए. व्ही. जी. गोट फार्म या शेळी प्रशिक्षण संस्थेच्या गोडाऊनमध्ये मौजे चित्तेगाव, ता. मुल, जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी बनावट देशीदारू तयार करण्याच्या कारखान्यावर छापा टाकुन सदरचा बनावट देशीदारू कारखाना उध्वस्त केला.

३०८० ब. लिटर स्पिरीट (मद्यार्क) अवैध बनावट देशी मद्य सदृश्य द्रावण ५०० लिटर, सिल करणारी मशीन १, वेट मशीन १, ५७ हजार ९० मिली क्षमतेच्या रिकाम्या बाटल्या, रॉकेट ब्रांडचे बनावट १,५०,००० बनावटी लेबल, फ्लेवर बॉटल - १०, मोटार पंप - १, प्लास्टिक ट्रे - १४, सिलेंडर व शेगडी - १, चिकटपट्टी बंडल ३ बॉक्स, बुचे - ५ बॉक्स, खरड्याचे पुठ्ठे - ३५००, पाईप, बकेट - २ मग्गा ४ रिकामे ड्रम - १०, रबर पाकेट - ५०, हायड्रोमीटर - ०१, इसेन्स बाटली - ०४, डिंक बॉटल, ५०० ली. क्षमतेच्या २ पाण्याच्या टाक्या, ब्लेंड घुसाळण्याची इलेक्ट्रिक रवी - ०१, दोरीचे ०५ बंडल असा एकूण रु.१६,५०,०००/- रुपयांचा मुद्देमाल आढळून आला आहे. दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मुल येथे गुन्हा क्र. ०४/२०२३, दि. २५/०१/२०२३ नोंद करण्यात आला असून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून यातील आरोपी पवन उर्फ गोलू वर्मा व राजू शामराव मडावी फरार झाले.

राज्य उत्पादन शुल्क, निरीक्षक वरोरा यांनी दि. १७/०९/२०२३ रोजी सिंदेवाही तालुक्यात बनावट देशीमद्याचे १० बॉक्स व चार चाकी वाहन जप्त केले होते. सदर गुन्ह्यात फरार झालेल्या आरोपिंचा या गुन्ह्यातही समावेश असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळविले आहे.

सदर कारवाई डॉ. श्री. विजय सुर्यवंशी, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, सुनील चव्हाण, संचालक (अं.व.द.) महाराष्ट्र राज्य मुंबई, मोहन वर्दे, विभागीय उपआयुक्त, रा. उ. शु., नागपूर विभाग, संजय पाटील, अधीक्षक, रा. उ. शु., चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली संदीप राउत, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मुल यांनी केली.

यामध्ये विकास बी. थोरात, निरीक्षक, रा. उ. शु., वरोरा, ईश्वर वाघ, निरीक्षक, भरारी पथक, चंद्रपूर, अमित क्षीरसागर (दु. निरीक्षक ), संजय आक्केवार (दु. निरीक्षक), अभिजित लिचडे (दु. निरीक्षक), जगदीश पवार (दु. निरीक्षक ), सौ. मोनाली कुरुडकर (दु. निरीक्षक) तसेच जवान सर्वश्री चंदन भगत, अजय खताळ, गोकुळ पवार, राहुल अत्रे, किशोर पेदुजवार, जगदीश कापटे, प्रशांत घोडमारे, दिलदार रायपुरे, जगन पुठ्ठलवार, प्रविकांत निमगडे यांनी पार पाडली.

Post a Comment

Previous Post Next Post