चंद्रपूर नागपूर हायवेवर अज्ञात वाहनाच्या धडकेत इसमाचा जागीच मृत्यू


चंद्रपूर:- प्राप्त झालेल्या माहितीनुसार चंद्रपूर नागपूर हायवे वर अज्ञात वाहनाच्या धडकेत इसमाचा अपघात होऊन जागेवरच ठार झाल्याची माहिती प्राप्त झालेली आहे.



सदर इसमाचे नाव लोकेश ठिकरे असे आहे . सदर इसमाला डोक्याला जबर मार लागल्यामुळे रक्ताचा सडा पडला होता . सदर इसम स्वतःचे धान विकून येत असताना हा अपघात घडला त्या इसमाच्या खिशामध्ये वीस हजार रुपये आढळून आले.

घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जमली होती.


Post a Comment

Previous Post Next Post