ग्रामपंचायत केशोरी /कनेरी यांच्या वतीने ,सरपंच नंदकुमार गहाणे यांच्या मार्गदर्शनात वृक्षारोपणाचा नाविन्यपूर्ण उपक्रम.


केशोरी /कनेरी ग्रामपंचायच्या वतीने ,मातृ सेवा संघ, पोलीस स्टेशन केशोरी कनेरी, व वनविभाग केशोरी/ कनेरी या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने , ज्या ठिकाणी गावासाठी मातृ संघाच्या वतीने जमीन राखून ठेवलेली होती .नंतर ग्रामपंचायत च्या वतीने अनेक समस्याला तोंड देऊन गावासाठी, गावातील ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना एक चांगलं क्रीडांगण उपलब्ध व्हावं. शरीर आरोग्य संपन्न आणि सुदृढ राहण्यासाठी व्यायामाची फार गरज असते .त्या ठिकाणी सर्व ज्येष्ठ नागरिकांना व विद्यार्थ्यांना व्यायाम करता यावं. यासाठी सरपंच नंदकुमार गहाणे यांनी एक नाविन्यपूर्ण उपक्रम तयार करून ग्रामपंचायत च्या मदतीने व लोकवर्गणीतून त्या ठिकाणी पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून ,वनविभाग भरतीच्या दृष्टिकोनातून, सभोवताल ट्रॅक तयार केली‌. आणि त्या पटांगणातील परिसरातील भाग खोलवर होता. त्या ठिकाणी तलावातील उपसा करून ,त्या ठिकाणची माती त्यात ग्राउंड वरती टाकण्यात आली. यासाठी त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय अर्जुनी/ मोर तसेच तहसीलदार ,केशोरीचे ठाणेदार, वन विभागातील वनक्षेत्र अधिकारी यांच्या मदतीने पूर्णतः ग्राउंड सपाटीकरण केलं. सपाटीकरण झाल्यानंतर त्याच्या बाजूला वृक्षारोपण केलं पाहिजे हा मनात विडा उचलून त्यांनी प्रथम पाण्याची पाईपद्धारे व्यवस्था केली. एक महिन्यापूर्वीच खड्डे तयार करून त्या ठिकाणी माती आणि शेणखत टाकले. व खड्डे वृक्षारोपणासाठी तयार केले. त्या खड्ड्यामध्ये कनेरी/ केशोरी येथील सर्व विभागातील विद्यालय, वनविभाग चे कर्मचारी ,पोलीस स्टेशन चे कर्मचारी, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे पदाधिकारी.. ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य गन व आतापर्यंत झालेले पूर्वीचे ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, ज्येष्ठ नागरिक यांना एकत्र करून नाविन्यपूर्ण झाडे लावण्याचा उपक्रम यशस्वी केला. या झाडांमध्ये फक्त आंब्याचे झाडे ठेवली. केशरी, लंगडा,दसरीया वैशिष्ट्यपूर्ण जातीचे आंब्याचे झाडे लावण्यात आली. जवळपास 70 झाडे या ग्राउंड वरती लावली. तेवढेच नाही तर झाडा









सभोवताल जाडी (कुंपण)गुंडाळून झाडाची सुव्यवस्थापन कसे करता येईल. तसे जिवंत कसे राहतील याची योग्य प्रकारची काळजी सुद्धा घेण्यात आलेली आहे. एकंदरीत हा परिसर व्यायामाच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी व्यायाम शाळा. स्वच्छतागृह, पाण्याची व्यवस्था, व्हॉलीबॉल चे मैदान ,क्रिकेटचे मैदान असे विविध उपक्रम या ठिकाणी राबविले जातात. त्या ठिकाणी अद्यावत व्यायाम शाळा आहे. जवळपास सायंकाळी आणि संध्याकाळी पोलीस भरतीचे विद्यार्थी, वन विभाग भरतीचे विद्यार्थी. या ठिकाणी ट्रॅक वर फिरत असतात. सरपंच नंदकुमार गहाणे यांचं एक चांगलं विजन लक्षात घेऊन .त्याने झाड जगविण्याचा मानस
स्वीकारलेला आहे. यापूर्वी प्रथम ग्रामपंचायतचे सदस्य अस्थानी सुद्धा केशोरी नगरीतील अशोकाचे झाडे लावण्याचा उपक्रम त्यांनी राबविलेला होता. त्यावेळेस तो यशस्वी झाला. त्यावेळेस जसा उपक्रम यशस्वी झाला .अगदी त्याप्रमाणे यावेळी सुद्धा हा कार्यक्रम आपण यशस्वी करू ‌असा ठाम विश्वास केशोरी/कनेरी नगरीतील सरपंच नंदकुमार गहाणे यांनी व्यक्त केला. त्यामुळे सर्व गावकऱ्याकडून एक नाविन्यपूर्ण वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविलेला आहे ‌अशी चर्चा होत आहे‌

Post a Comment

Previous Post Next Post