वक्त्यांचा सुर श्री किसनराव खोब्रागडे महाविद्यालयात बक्षीस वितरण.. स्वामी विवेकानंदाचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी



वैरागड :-  उठा, जागे व्हा..! आणि जेव्हा पर्यंत मार्गक्रमण करा की तुम्ही आपल्या चांगल्या ध्येयापर्यंत पोहोचत नाही. ज्यावेळी तुमच्या जीवनात समस्या येत नाही तर जगण्याचा मार्ग बदलून घ्या असा मोलाचा संदेश देणारे स्वामी विवेकानंद हे तरुणांसाठी प्रेरणास्थान आहेत असे प्रतिपादन व बक्षीस वितरण कार्यक्रमात मान्यवरांनी व्यक्त केले .
    
  श्री किसनराव खोब्रागडे महाविद्यालय व महाराष्ट्र विद्यालय वैरागडच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी आयोजित क्रीडा स्पर्धांचा बक्षीस वितरण दि. 14 जानेवारीला श्री किसनराव खोब्रागडे महाविद्यालयाच्या सभागृहात घेण्यात आला याप्रसंगी माजी जि. प. समाज कल्याण सभापती विश्वास भो, दत्तू सुमनकार ,डि.के. उघाडे, रामदास डोंगरवार, प्रा. प्रदीप बोडणे, प्रा. अमोल नेपाल प्रा. टी. एस. बर्वे प्रा. वासनिक प्रामुख्याने उपस्थित होते.
   
 यावेळी मुलांसाठी घेण्यात आलेल्या 800 मीटर दोन स्पर्धेत अनुक्रमे संकेत चुधरी, कोविद श्रीरामे, निखिल मोहुरले , मुलींच्या 400 मिटर दौड स्पर्धेत माधुरी सातपुते, अमिषा कुमरे, रितू सीडाम गोडा फेक स्पर्धेत मुलांमधून रोशन पावले, कोविंद श्रीरामे ,मुलींमधून प्रणाली धोटे, गायत्री गिरडकर विजेते ठरले विजेत्या स्पर्धकांना सरपंच संगीता पेंदाम, उपसरपंच भास्कर बोडणे ,विश्वास भोवते, दत्तू सोमनकर ,प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. धुमाळे, सुभाष हर्ष, गिरीश बोधनकर, अजय नवहाते यांचे कडून रोख स्वरूपात बक्षीस देण्यात आले .

    कार्यक्रमाचे संचालन प्रा. नरेंद्र लाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रा.पं. सदस्य आदेशआकरे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री किसनराव खोब्रागडे कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
 

Post a Comment

Previous Post Next Post