परभणीत मुस्लीम कुटुंबानी 'शिवपुराण कथेसाठी' दिली तब्बल ६० एकर जमीन...*


🤝 परभणी जिल्ह्यातील एका मुस्लिम कुटुंबाने पाच दिवस चालणाऱ्या 'शिवपुराण कथे' च्या आयोजनासाठी आपली ६० एकर जमीन देण्याचा निर्णय घेत सर्वांची मने जिंकली. या कुटुंबाने केवळ जमीनच मोफतच दिली नाही, तर हिंदू धर्मिय कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी १५ एकरांवर पेरलेली तूर आणि चार एकरांवर पेरलेले हरभऱ्याच्या उभ्या पीकावर ट्रॅक्टर फिरवली.

✨सय्यद कुटुंबातील सदस्यांनी दाखवलेल्या दर्यादिलपणाचं संपूर्ण देशात कौतुक होतंय. हिंदू मुस्लिम यांच्यातील कटुता नष्ट करण्याचाच आमचा या कृतीमागील हेतू असल्याचं सय्यद कुटुंबाने सांगितलं.

📖 परभणीत १३ ते १७ जानेवारी दरम्यान शिवपुराण कथेचं आयोजन करण्यात आलं. परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांनी आयोजित केलेला कार्यक्रम कुठे घ्यायचा, हा त्यांच्या पदाधिकाऱ्यांसमोर प्रश्न होता. त्याचवेळी सय्यद कुटुंबाने आपली ६० एकर जमीन शिवपुराण कथेसाठी दिली..

🗣️ जमीन मालक शोएबचे वडील अबुबकर भाईजान म्हणाले, "आमच्या हिंदू बांधवाच्या धार्मिक कार्यक्रमासाठी आमच्या जमिनीचा वापर होतोय, ही आनंदाची गोष्ट आहे. धार्मिक सलोखा सगळ्यांनी राखायला हवा. हाच खरा भारत आहे.

▪️तसेच शोएबचे मामा सय्यद अब्दुल कादर म्हणाले, "मागील महिन्यात तबलीग जमात इज्तेमा हा मुस्लिम धर्मीयांचा मोठा कार्यक्रम होता. त्यावेळी आम्हाला हिंदू बांधवांनी जमीन दिली होती. ज्या कार्यक्रमासाठी सुमारे तीन लाख मुस्लिम लोक उपस्थित होते. आणि आता जेव्हा आमचे हिंदू बांधव त्यांच्या धार्मिक कार्यक्रमासाठी जमीन शोधत होते, तेव्हा त्यांना जमीन देणे आमचे कर्तव्य होते".


Post a Comment

Previous Post Next Post