चामोर्शी पोलीस निरीक्षकाने पत्रकार विनोद कोडापे यांची केली अश्लील शिवीगाळ

अनुप मेश्राम. प्रतिनीधी 


पती-पत्नीच्या घरगुती समस्या चामोर्शी पोलीस स्टेशन पर्यंत पोहचल्यानंतर. चामोर्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक खाडवे यांनी पत्रकार विनोद कोडापे महाराष्ट्र वार्ता 24 न्युज.यांची कोणतीही कोटुंबिक समस्या ऐकून न घेता. उलट विनोद कोडापे यांचीच अश्लील शब्दात शिवीगाळ करून 



तुझ्या सारखे असे अनेक पत्रकार मी बघितले आहेत .इतरां सारखा मी पत्रकारांना भिणारा पोलीस निरीक्षक नाही. असे पोलीस निरीक्षक खाडवे यांचे धमकी देणारे शब्द विनोद कोडापे यांनी आपल्या मोबाईल वर रेकार्डिंग सुद्धा करून ठेवलेले आहेत. पोलीस निरीक्षक खांडवे यांना त्वरित निलंबित करण्यात यावे. खाडवे यांच्यावर निलंबाची कारवाई न केल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयापुढे आमरण उपोषणाला बसण्याचा संकल्प विनोद कोडपे यांनी केलेला आहे.पोलीस निरीक्षक खाडवे यांच्यावर नीलबनाची कारवाही करण्यासाठी पत्रकार विनोद कोडापे यांनी पोलीस माहासंचालक मुंबई, पोलीस अधीक्षक गडचिरोली, गृह सचिव मंत्रालंय मुंबई यांना एक लेखी निवेदन सुधा पाठविलेले आहे..

Post a Comment

Previous Post Next Post