दोन म्हशी पैकी एका म्हशीचे तुकडे तुकडे - करुन इतरत्र शेतात व एक म्हैस आणि एक तुकडा विहीरीत फेकणारे क्रूरकर्मा कोण ?


चामोर्शी तालुक्यातील सोमनपल्ली येथे दोन म्हशी पैकी एका म्हशीचे तुकडे तुकडे - करुन इतरत्र शेतात व एक म्हैस आणि एक तुकडा विहीरीत फेकणारे क्रूरकर्मा कोण असा प्रश्न तेथील स्थानिक लोकांना पडला आहे.

सोमनपल्ली येथील रुषीदेव शंकर चटारे व सुरेश मोतिराम मेश्राम या दोन शेतकऱ्यांच्या म्हशी दि २७ फेब्रुवारी रोज सोमवार ला सायंकाळी घरी आल्या नाहीत म्हणून त्यांनी शोधमोहीम राबविली परंतू चार दिवस होऊनही पत्ता लागलेला नव्हता त्यानंतर शेतशिवारात शोध घेण्यासाठी गेले असता कालीदास तावाडे रा. वायगाव यांच्या विहीरीत एक म्हैस व एक म्हशीचे तुकडे विहीरीत तरंगताना दिसून आले व आजुबाजुला फिरुन पाहिले असता शंकर नेवारे यांच्या शेततळ्यात एक पायाचा तुकडा, मुरलीधर ठाकरे यांच्या शेतात चामडे व काही अवयव आढळून आले. असे कृत्य करणारा क्रुरकर्मा कोण असावा म्हणून रुषीदेव शंकर चटारे व सुरेश मोतिराम मेश्राम यांनी आष्टी पोलीस स्टेशन ला जाऊन तक्रार दाखल केली त्यावरुन अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्यातील आरोपी कोन आहेत याचा आष्टी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post