10 ते 15 जणांनी केला युवकावर हल्ला

वणी:-शहरातील सेवा नगर मधील काही तरुणांनी शास्त्री नगर येथील एका युवकावर हल्ला केल्याची घटना उघडकीस आली असून या हल्ल्यातील जखमी युवकाच्या आईला सुध्दा मारहाण केली असल्याची माहिती मिळाली आहे.
पियुश बंडु बदखल (२०) रा.शास्त्री नगर असे हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. आज शुक्रवार ला सकाळी धुलीवंदनाच्या दिवशी ११ वाजता चे सुमारास सेवा नगर मधील काही तरुणांनी शास्त्री नगर येथे पियुश बदखल यांचेवर हल्ला चढवला व लाथा बुक्क्याने मारहाण केली या दरम्यान पियुश ची आई बचावासाठी आली असता तीलाही मारहाण करण्यात आले आहे. हि घटना शास्त्री नगर येथील शारदा सॉमिल जवळ असलेल्या पियुश बंडु बदखल यांचे घराजवळ घडली असून हल्ल्यात जखमी पियुश ला उपचारासाठी वणीच्या ग्रामिण रुग्णालयात नेण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे १० ते १५ तरुणांनी पियुश बदखल वर हल्ला चढवल्याचे स्थानिकांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post