22 लाख रुपये भ्रष्टाचार प्रकरणी माजी सरपंच आणि ग्रामसेवकाची जेलमध्ये रवानगी

घोसरी : जनसुविधा योजना निधीची अफरातफर केल्याच्या आरोपाखाली नांदगावचे तत्कालीन सरपंच मंगेश मगनूरवार व ग्रामसेवक उत्तम बावनथडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला . अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करीत होते . परंतु न्यायालयाने जामीन न दिल्याने पोलिसांसमोर शरण आले . आरोपींना न्यायालयात हजर केले केले असता , दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली ग्रामपंचायत नांदगाव येथे सन २०२०- २१ या वित्तीय वर्षात जनसुविधा योजनेंतर्गत ग्रामपंचायत भवन व स्मशानभूमी बांधकामाकरिता ऑनलाईन निविदा प्रक्रिया झाली . अनेक कंत्राटदारांनी निविदा सादर केल्या होत्या परंतु तत्कालीन सरपंच मंगेश मगनूरवार व ग्रामसेवक बावनथडे यांनी या निधीमधून बांधकाम न करतापरस्पर शासकीय निधीतील २२ लाख ४ हजार ८४६ रुपये सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येण्याच्या तोंडावर २०२० मध्ये चार महिन्यांच्या कालावधीत १ ९ वेळा धनादेशांवर सेल्फ काढल्याचा धक्कादायक प्रकार विद्यमान सरपंच हिमाणी वाकूडकर यांच्या लक्षात येताच जनसुविधा योजनेची माहिती मिळविली . प्राप्त दस्तऐवजाची पडताळणी केली असता , तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकाने जनतेच्या कल्याणासाठी प्राप्त निधीचा अपहार केल्याचे दिसून आल्याने याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती .

Post a Comment

Previous Post Next Post