आरमोरी तालुक्यातील बॅटरी चोरांचा धुमाकूळ,3,4 महिन्यात तीन, चार बॅटरी लंपास


आरमोरी:- तालुक्यातील ठाणेगाव परिसरात अनेक दिवसापासून भुरट्या चोरांचा हैदोस वाढला असून चोरटे लहान मोठया वस्तु सोबतच आता ट्रॅक्टरच्या बॅटऱ्यांची चोरी करने सुरू केले असून चोरीचे प्रमाण वाढले आहे.
गेल्या एका महिन्यामध्ये तिन ते चार ट्रॅक्टरच्या बॅटऱ्या भुरट्या चोरांनी लंपास केले आहे. यामध्ये आरमोरी येथील दीपक हेडाऊ यांच्या ट्रॅक्टरच्या बॅटरीची २४ फेब्रुवारीच्या रात्रीच्या सुमारास, डोंगरगाव येथील राजेंद्र श्रावण ढोरे यांच्या ट्रॅक्टरच्या बॅटरीची २५ फेब्रुवारी तर ठाणेगाव येथील चंद्रशेखर कवडू किरमे यांच्या ट्रॅक्टरच्या १२ मार्च ला रात्रीच्या सुमारास बॅटरीची चोरी केली.
यामुळे परिसरातील ट्रॅक्टर मलकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

आजच्या बाजार भावानुसार एका बॅटरीची किमत ८ ते १० हजार रूपये पर्यंत आहे. व ट्रॅक्टर मालकांचे बऱ्याच प्रमाणात नुकसान होत आहे. चोरटे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन ट्रॅक्टरच्या बॅटरीची चोरी करीत आहेत. यामुळे पोलीस विभागाने रात्रीची गस्त घालून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post