महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ पिंपळगाव (भोसले) संस्थेचे संस्थापक, सचिव श्री नरहरी मुरारी क-हाडे अ-हेरनवरगाव यांना शाळेच्या वतीने भावपूर्ण आदरांजली


वैरागड:- महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ पिंपळगाव (भोसले) या शिक्षण संस्थेचे  संस्थापक, सचिव श्री नरहरी मुरारी क-हाडे अ-हेरनवरगाव यांचे 18 मार्च 2020 ला निधन झाले असता महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ पिंपळगाव (भोसले) द्वारा संचालित- महाराष्ट्र विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय वैरागड तालुका - आरमोरी
जिल्हा- गडचिरोली या शाळेच्या वतीने मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी  दोन मिनिटे मौन पाळून आदरांजली वाहिली.
 या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री आर. डी.उदिंरवाडे सर यांनी सचिव साहेबांच्या कार्याचा इतिहास विद्यार्थ्यांना सांगून मोलाचे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमा प्रसंगी संस्थेचे सदस्य प्रविण क-हाडे सर , गुरनुले सर, निकोसे सर,कुभांरे सर,वैरागडे मँडम,चटकी सर, आणि सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post