वैनगंगा नदीवर पोहायला गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू

डारा : धुलिवंदनाच्या दिवशी मित्रासोबत माडगी येथील वैनगंगा नदीवर पोहायला गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली आहे . चाहूल हरीश इलमे ( 18 ) रा . बजाज नगर तुमसर असे मृत तरुणाचे नाव आहे . चाहूल हा आपल्या चार ते पाच मित्रासोबत तो माडगी येथील वैनगंगा नदीपात्रात पोहायला गेला होता . नदीपात्रात उतरला असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे चाहूल गटांगळ्या खाऊ लागला . यावेळी त्याचे मित्र मदतीकरिता धावले व त्यांनी आरडाओरड केली . परंतु , तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता . घटनेची माहिती मित्रांनी चाहूलच्या काकाच्या मुलाला मोबाईलवर दिली . कुणाल ईलमे तत्काळ घटनास्थळी दाखल झाला . कोळी बांधवांच्या मदतीने चाहूलला पाण्यातून काढण्यात आले . त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्तकरण्यात येत आहे . सदर घटनेची नोंद करडी पोलिसांनी घेतली असून पुढील तपास करडी पोलीस करीत आहेत .

हर्ष साखरे- मुख्य संपादक
9518913059

Post a Comment

Previous Post Next Post