मुलीच्या पालकांनो सावधान... आता अविवाहित मुलगी मागू शकते आपल्या वडीलाला लग्नाचा खर्च

रायपूरः छत्तीसगड उच्च न्यायालयाने एका याचिकेवर निर्णय देताना म्हटले की, हिंदू दत्तक आणि भरण- पोषण अधिनियम १९५६ कायद्यानुसार एक अविवाहित मुलगी आपल्या आई-वडिलांकडे लग्नाचा खर्च मागू शकते. त्याचबरोबर दुर्ग. जिल्हा कौटुंबिक न्यायालयाचा आदेश रद्द केला. उच्च न्यायालयाने दुर्ग जिल्ह्यातील रहिवाशी असणारी ३५ वर्षीय महिला राजेश्वरीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय दिला. न्यायमूर्ती गौतम भादुरी आणि संजय एस.'अग्रवाल यांच्या खंडपीठाने २१ मार्च रोजी या प्रकरणावर सुनावणी करताना परवानगी दिली होती. अधिवक्ता ए. के. तिवारी यांनी याचिकेमध्ये सांगितले की. हिंदू दत्तक आणि भरण-पोषण अधिनियम १९५६ कायद्यानुसार एक अविवाहित मुलगी आपल्या आई-वडिलांकडे स्वतःच्या लग्नाचा खर्च मागू शकते. भिलाई स्टील प्लांटमध्ये काम करणाऱ्या भानुरामची मुलगी राजेश्वरीने सन २०१६ मध्ये उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती.

Post a Comment

Previous Post Next Post