जागतिक महिला दिन तथा सावित्रीमाई फुले स्मृती दिनानिमित्ताने प्रबोधन कार्यक्रम तसेच सत्कार समारंभ



गडचिरोली:- नवेगाव येथील सम्यक बुद्ध विहारच्या भव्य वास्तू मध्ये शनिवार दि. 12/03/2022 ला मैत्री संघ गडचिरोली द्वारे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक ,मा. डॉ. उज्वला शेंडे, मा. डॉ. खुशबू दुर्गे, मा. करुणा खोब्रागडे, मा. सुधा चौधरी , मा. भारती मडावी, मा.लता शेंद्रे ,मा.कमल लाऊत्रे , मा. खेवले महिला समिती अध्यक्ष ह्याची उपस्थिती होती ,
महिलांनी स्वतःचे आरोग्य सांभाळून, कुटुंबाची , समाजाची जबाबदारी सुध्दा सांभाळली पाहिजे , महानायिकांचा आदर्श घेतला पाहिज,असे सखोल मार्गदर्शन केले , त्याचप्रमाणे स्वरचित कविता सुध्दा सादर केल्या गेल्या , कार्यक्रमाच्या अध्यक्ष मा. तारका जांभूळकर होत्या , सावित्रीमाईला जे शिक्षण अपेक्षित होतं, ते जर महिलांनी समजून घेतलं , तरच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकेल .रूढी , परंपरेला तिने त्याकाळी मूठमाती दिली , आधुनिक स्त्रियांनी केवळ फॅशनच्याच मागे न धावता , विचारांची पातळी सुध्दा उंचावण्याचा प्रयत्न करावा, असे वक्तव्य त्यांनी केले ,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. सुजाता उके यांनी केले , प्रास्ताविक मा. उत्तरा जनबंधू तर आभार मा. पौर्णिमा दुर्गे यांनी मानले,
समाजासाठी कार्य करणाऱ्या महिलांचे सत्कार करण्यात आले ,यावेळी मैत्री संघातील मा. शोभा खोब्रागडे, मा.हंसा टिपले,मा.छबिता मेश्राम, मा.लीना ढोलणे, मा.अमिता टिपले, मा. उज्वला साखरे मा.विभा उमरे , मा.रोझा बारसागडे, मा. वेणूताई खोब्रागडे, मा. कविता जांभुळकर ह्या प्रामुख्याने उपस्थित होत्या तसेच नवेगाव परीसरातील महिला सुद्धा बऱ्याच संख्येनं उपस्थित होत्या ,
अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

Post a Comment

Previous Post Next Post