ट्रॅक्टर व दुचाकीच्या धडकेत 2 इसम गंभीर जखमी

कुरखेडा:- विरूद्ध दिशेने येणाया ट्रॅक्टर व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातातील दुचाकीवरील दोन इसम गंभीर जखमी झाल्याची घटना 8 एप्रिल रोजी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास कूरखेडा-वडसा मार्गावरील आंधळी फाट्यावर घडली. जीवन भाऊराव पराते ( 27 ) रा. नवरगाव (सिंदेवाही), निलेश निखारे (29) रा. आष्टा (आरमोरी), अशी गंभीर जखमींची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार नवरगाव येथील जिवन पराते हे दुचाकीने स्वतःच्या लग्नाची पत्रिका कुरखेडा तालुक्यातील सोनेरांगी व तळेगाव येथील नातेवाईकांना देऊन परत कुरखेडा-वडसा मार्गाने स्वगावाकडे जात असताना आंधळी येथून विटा भरलेले एमएच 33 वी 1749क्रमांकाचे ट्रॅक्टर आंधळी फाट्यावर अचानक रस्त्यावर आल्याने दुचाकीस्वाराचे नियंत्रित बिघडल्याने दुचाकीची ट्रॅक्टरला जबर धडक बसली.

या झालेल्या अपघातात दुचाकी वरील जीवन भाऊराव पराते हा गंभीर तर निलेश निखारे हे दोघे जखमी झाले. दरम्यान याच मार्गाने येत असलेल्या काळीपावळी टॅक्सी चालकनांने दोघांनाही कुरखेडा उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र जीवन पराते यांची प्रकृती गंभीर असल्याने त्याना जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची नोंद कुरखेडा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी अपघातातील ट्रक्टर व दूचाकी ताब्यात घेतली आहे. पुढील तपास कुरखेडा पोलिस करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post