अन् 200 पोलिस गुंतले तपासात....


चंद्रपूर : निर्वस्त्र अवस्थेत तरुणीचे शिरावेगळे धड आढळलेल्या घटनेला 3 दिवसांचा कालावधी लोटूनही पोलिसांच्या हाती कोणतेही पुरावे लागले नाहीत. अद्याप ना तरूणीची ओळख पटली आहे तर ना मारेकऱ्यांचा शोध लागलेला आहे. अत्यंत गंभीर स्वरूपाच्या या घटनेची पार्श्वभूमी पाहता चंद्रपूर जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांसह सुमारे २०० पोलीस या तपासात गुंतले आहेत. तपास कोणत्या दिशेने सुरू आहे, याबाबत कमालीची गुप्तता बाळगली जात आहे.

मंगळवारी सायंकाळी नागपूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांनी भद्रावती गाठून सर्व पोलीस अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी तपासाला गती देण्यासाठी काही दिशानिर्देश दिललेत त्यामुळे तपासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तविली आहे. तरुणीचे मुंडके कापूनही घटनास्थळी रक्त आढळूनर आले नाही. यावरुन इतरत्र हत्या करून धड भद्रावती येथे आयटीआय समोरील शेतात आणून टाकल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्यांदाच अतिशय क्रूर पद्धतीने खून केल्याची घटना सोमवारी (4 एप्रिल) ला भद्रावतीत उघडकीस आली होती. सुमारे २५ वर्षीय वयाच्या तरुणीचा निर्वस्त्र अवस्थेत धडापासून शिर वेगळे केलेला मृतदेह आढळून आला होता. या घटनेत मारेकऱ्यांनी त्या तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिचा क्रूर पद्धतीने खून केला असावा, अशी चर्चा आहे; परंतु शिर न सापडल्याने मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना 3 दिवसाचा कालावधी होवूनही यश आले नाही. ही तरुणी कोण आहे? याबाबत अद्याप कोणीही पुढे आले नाही. ही बाब तपासात मोठी अडसर ठरत आहे. पोलिसांनी सर्व बाजूने तपासाला गती दिलेली आहे. सुमारे २०० पोलीस अधिकारी व पोलीस या तपासात गुंतले आहेत. ओळख पटविणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले आहे.

या घटनेचे गांभीर्य ओळखून नागपूरचे विशेष पोलीस महासंचालक छेरिंग दोरजे हेसुद्धा भद्रावतीत दाखल झाले आहेत. फिंगरप्रिंट एक्स्पर्ट, फॉरेन्सिक टीम, श्वान पथक वेग वेगळ्या दिशेने तपास होत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post