शिवसेना आमदाराच्या पत्नीने गळफास घेऊन केली आत्महत्या

मुंबई : मुंबईतील कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीने आज (ता. १७ एप्रिल) आत्महत्या केली आहे. रजनी कुडाळकर (वय ४२) असे त्यांचे नाव आहे. मंगेश कुडाळकर हे शिवसेनेचे आमदार आहेत. ही घटना कुडाळकर यांच्या राहत्या घरात घडली आहे
या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. नेहरू नगर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

रजनी कुडाळकर यांनी रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान आत्महत्या केल्याचे समजते. पोलिसांनी रजनी यांचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात ‘पोस्टमॉर्टम’साठी पाठवला आहे. हा अहवाल आल्यानंतर पुढील गोष्टी स्पष्ट होतील, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post