वैरागड- आरमोरी महामार्गावर ट्रॅक - ट्रॅक्टरचा झाला अपघात



वैरागड : - येथून आरमोरी मार्गावर जाणाऱ्या अवघ्या काही अंतरावर पाच पांडव वळणावर आज दुपारी १२ वाजताच्या दरम्यान आरमोरीकडे जाणाऱ्या पियस + न्यू हॉलंड ३०३७ या ट्रॅक्टरला मागून एका ट्रकने धडक दिली. ट्रॅक्टर रस्त्याखाली पलटी मारल्याने तिघे जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार मालेवाडा येथून आरमोरी येथे लग्न मंडप कामाचे साहित्य घेऊन पियस + न्यू हॉलंड ३०३७ ट्रॅक्टर जात होते. वैरागड जवळील पाच पांडव वळणावर एका अज्ञात ट्रकने ट्रॅक्टरला मागून धडक देऊन पसार झाला. धडक येवढी जबरदस्त होती की ट्रॅक्टर रस्त्याखाली उलटी पलटली. यात ट्रॅक्टरवर सवार सचिन हेलाऊट (वय २७ वर्षे) रा. आरमोरी, पवन राऊत (वय २२ वर्षे) रा. आरमोरी आणि खेमाराज पत्रे (वय 22 वर्षे) रा. देऊळगाव यांच्या हात-पायाला जबर मार लागल्याने वैरागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. मेश्राम यांनी उपचार करून पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे पाठविण्यात आले. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

Post a Comment

Previous Post Next Post