*उपकेंद्र चुडावा येथे आरोग्य वर्धिनी दिन साजरा.*

चुडावा(ता.पूर्णा):-
             प्रा.आ.केंद्र-कावलगाव अंतर्गत उपकेंद्र-चुडावा येथे दि.१६ एप्रिल २०२२ ला ४था आरोग्य वर्धिनी दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष रंजना देसाई सरपंच ग्रा.पं. कार्यालय चुडावा,उदघाटक विश्वनाथअप्पा सोळंके चुडावा,प्रमुख अतिथी म्हणून सुभाष देसाई उपसरपंच ग्रा.पं. कार्यालय चुडावा,डॉ.गजानन राऊत वैद्यकीय अधिकारी प्रा.आ केंद्र-कावलगाव,डॉ.विशाल गोपछडे,टि.एस.इनामदार आरोग्य सहाय्यक,रवी वैद्य आरोग्य सहाय्यक, एल.के.कासार आरोग्य सेविका, एम.आर.वाटगुरे आरोग्य सेवक, सर्व सदस्य ग्रा. प. कार्यालय चुडावा,उपकेंद्र चुडावा येथील सर्व आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविका, मदतनीस, आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
              आरोग्य वर्धिनी दिनाचे औचित्य साधून चुडावा येथे आरोग्य शिबीर घेण्यात आले. यावेळी बिपी, शुगर, दमा,ताप रुग्णाचे रक्तनमुने, घेण्यात आले. PMMVY,HBNC विषयी माहिती, अंगणवाडीतील लहान मुलांची तपासणी,गर्भवती महिलांची तपासणी करण्यात आली.आणि गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
         कार्यक्रमाचे संचालन मोहन वाटगुरे आरोग्य सेवक यांनी केले.प्रास्ताविक डॉ.गोपछडे आणि आभार प्रदर्शन एल.के. कासार आरोग्य सेविका यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपकेंद्र चुडावा येथील आशा वर्कर यांचे मोलाचे योगदान दिले.

Post a Comment

Previous Post Next Post