कोंढाळा गावातच अवैधरित्या धंदे सुरू झाले की काय? - देसाईगंज तालुक्यातील अवैध धंदे बंद करणार कोण...!


सत्यवान रामटेके(उपसंपादक)
"सुपरफास्ट न्यूज"
देसाईगंज तालुक्यातील शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणावर ऊत आले असूनही केवळ एकट्या कोंढाळा गावालाच टार्गेट केले जात असल्याने फक्त कोंढाळा येथेच अवैध धंदे सुरू झाले की काय? व देसाईगंज तालुक्यातील बाकीच्या गावातील अवैधरित्या चालणारे धंदे बंद करणार कोण..?असा सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जातो आहे.
देसाईगंज शहरातील मुख्य बाजारपेठ,वडसा व काही वार्ड तसेच मुख्य रस्त्यालगत त्याचबरोबर
तालुक्यात कुरुड,शिवराजपुर,उसेगांव,किन्हाळा-मोहटोला,तुळशी,कोकडी,विहिरगांव,पोटगांव,चिखली रिठ,डोंगरगाव,आमगाव,सावंगी,गांधीनगर,चोप, कोरेगांव,बोळधा,एकलपूर व इतर गावांमध्ये कित्येक अवैध धंदे वाढीस लागलेले असूनही याकडे दुर्लक्ष करून केवळ कोंढाळा गावाच सर्वांना दिसतो की काय?असा प्रश्न निर्माण झाला आहे.
एकाच गावाला नियंत्रित करण्यापेक्षा सर्वच शहर व सर्वच गावे नियंत्रित करून कारवाईचा बडगा उगारणे आवश्यक आहे.मात्र देसाईगंज तालुक्यात वेगळीच परिस्थिती पहावयास मिळत असल्याने अवैध धंदे बंद करण्यात येत असतील तर सर्व शहरी तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक मोठ्या पासून तर छोट्या पर्यंत अवैध धंद्यांवर आळा घालण्यात यावा असे जनसामान्यांतून सूर निघू लागले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post