जेष्ठ नेते शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटणार सगळीकडे.... - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लगेच घेतली दखल

मुंबई

सत्यवान रामटेके(उपसंपादक)
"सुपरफास्ट न्यूज"
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा,जेष्ठ नेते व खासदार शरदचंद्र पवार यांच्या घरावर काही अज्ञात इसमांनी अचानक केलेला हल्ला अत्यंत निंदनीय असून महाराष्ट्र राज्यात कधी न घडणारी घटना घडली असल्याने याचे पडसाद सर्वत्र उमटणार आहे.अज्ञात हल्लेखोर कोण?याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगेच दखल घेऊन पोलीस प्रशासनाला कारवाई करण्यास दिरंगाई न करता हल्लेखोरांना अटक करण्यासंदर्भात तात्काळ सूचना केल्या आहेत.
आज ८ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी काही जमाव होऊन घोषणाबाजी करतो व दगडफेक,चप्पलफेक करतो आहे.अशी कृती अतिशय निंदनीय,अनुचित व कुणालाही न पटणारी आहे.अशा हिंसेला उद्युक्त किंवा प्रक्षोभ निर्माण करणाऱ्यांवर तसेच चिथावणी देणाऱ्यांवर कायद्याने कडक कारवाई झाली पाहिजे.यासाठी राज्याचे मुख्यमंत्री यांनी गृहमंत्र्यांना सूचना दिल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post