हे असले कसले कीर्तन ... या कीर्तनकाराला कांही लाज - शरम- अब्रू आहे की नाही ? असले नालायक कीर्तनकार तातडीने अंदमान बेटावर भोंगळे करून पाठवले पाहिजेत ...

कीर्तनकाराचे अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तृप्ती देसाईंचे मोठे वक्तव्य; म्हणाल्या औरंगाबाद जिल्ह्यातील महिला आणि पुरुष कीर्तनकाराच्या अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर एकच एकच खळबळ उडाली आहे. एका महिलेसोबत हे कीर्तनकार नको त्या अवस्थेत दिसत असून, याच्या दोन व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.

पुरुष आणि महिला दोघंही औरंगाबाद जिल्ह्यातील प्रतिष्ठीत किर्तनकार आहेत. यापैकी महिला किर्तनकाराने विष प्राशान केल्याचं समोर आलं आहे.

किर्तनकार जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामुळे आपली बदनामी होत आहे, हे लक्षात आल्यानंतर महिलेने विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात महिलेवर उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे पुरुष किर्तनकारानंही काही टोकाचं पाऊल उचलू नये म्हणून महाराजांवर त्यांचे नातेवाईक लक्ष ठेवून आहेत.

यातच अनेकांनी कीर्तनकारांच्या या कृत्यावर संताप व्यक्त केला आहे. असे असतानाच आता याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी आपण कारवाईची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.तृप्ती देसाई म्हणाल्या, ‘एका प्रतिष्ठित कीर्तनकाराचे महिला कीर्तनकारासोबत संभोग करतानाचे व्हिडिओ व्हायरल झालेले असून ते मला प्राप्त झालेले आहे. मी आता कीर्तनकाराच्या नावासहित कारवाईची मागणी करणार आहे, अशी प्रतिक्रिया तृप्ती देसाई यांनी दिली आहे. त्यामुळे याप्रकरणी त्या कीर्तनकारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अश्लिल व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महाराजांवर कारवाई करण्याची मागणी वारकरी संप्रदायातून करण्यात येत आहे. यातील पुरुष किर्तनकार ४८ वर्षाचे असून ते वैजापूर तालुक्यातील आहे. तर महिला किर्तनकार ४० वर्षांच्या असून सिल्लोड तालुक्यातील आहेत.

धक्कादायक म्हणजे, शारिरीक संबंधावेळीचा व्हिडीओ खुद्द महाराजांनी शुट केला आहे. अशा प्रकराच्या दोन व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर फिरत असून वारकरी संप्रदाय या घटनेमुळे आक्रमक झाला आहे

Post a Comment

Previous Post Next Post