शिवीगाळ करण्याच्या कारणावरून वडील व मुलाला बेदम मारहाण

भंडारा : शिवीगाळ करण्याच्या
कारणावरून झालेल्या वादात वडील व मुलाला दोन भावांनी बेदम मारहाण केल्याची घटना पवनी तालुक्यातील चिखली येथे घडली. सुधाकर डोमळू मरघडे (५४) आणि शेषराज सुधाकर मरघडे (२८) अशी जखमींची नावे आहे. याप्रकरणी अमोल शिवदास बारसागडे आणि आशिष शिवदास बारसागडे (रा. चिखली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post